रमाई,प्रिय रामू ग्रंथ प्रसंग व पत्र वाचन,काव्य,गीत,गझलातून अनोखे अभिवादन ;कुणाल दरांडेंच्या हस्ते संत वाद्य साहित्याची भेट
येवला प्रतिनिधी :
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती,येवला संचलित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी सार्वजनिक वाचनालय-लोककवी वामनदादा कर्डक मुक्तिभूमी अभ्यासिका येवला,लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक,महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धांगिनी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२७ व्या जयंती निमित्त रमाई ह्या लेखक डॉ.यशवंत मनोहर व प्रिय रामू लेखक योगीराज बागुल लिखित पुस्तकातील काही प्रसंग वाचन,माता रमाई व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रांचे वाचन,त्यांच्या जीवन कार्याची माहिती सांगणाऱ्या काव्य,गझल,गीतांची मैफिलीचा कार्यक्रम येथील मुक्तिभूमी सार्वजनिक वाचनालयात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.विलास कांगणे हे होते.व्याख्याता प्रा.वैशाली दामले यांनी रमाईच्या जीवनावरील अनेक भावूक प्रसंगांना उजाळा दिला. कुणालभाऊ दराडे फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे,डॉ.अमोल शेजवळ हे ह्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सुप्रसिद्ध कवी शंकर आहिरे,सुनील गोविंद,संतोष सोनवणे,योगेश्वर सोनवणे यांनी गायन वादनातून रमाई आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. प्रा.शरद शेजवळ यांनी ‘सांगू किती व्यथेला मी पुरता छळलो आहे,तू जळते दिव्यप्रमाणे रमा,मी उभा पेटलो आहे,गरीब भोळ्या रमाई वरती,नवं कोटीच्या आईवर्ती काळाने घातलाय घाव,त्याक्षणी रडले ढकढळा भीमराव, ह्या गीतातून श्रोत्यांना भावविभोर केले.तर कवी नुमान शेख यांनी
तू मीरा बनेगी तो जहर मिलेगा
सीता बनेगी तो जलना पड़ेगा
राधा बनेगी तो जुदाई में रोना
द्रौपदी बनी तो पांचों संग सोना
ज्योती की ज्वाला तू सावित्री बन
शिवबा का माता जीजाबाई बन
अहिल्या,ताराबाई तू फातेमा बन
बाबासाहब की छाव रमाई बन
ह्या काव्य,गझला रसिकांची दाद मिळून गेल्या.राजरत्न वाहुळ यांनी रमाई व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रांचे वाचन करून डॉ.यशवंत मनोहर यांच्या रमाई व योगीराज बागुल यांच्या प्रिय रामू ह्या पुस्तकातील प्रसंगांचे प्रकट वाचन केले.
कुणालभाऊ दराडे फाउंडेशन च्यावतीने युवा कलापथकास संत वाद्य साहित्य संच,डॉ.अमोल शेजवळ यांच्यावतीने ग्रंथ,जन साथी कलकथित समाभाऊ पगारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ वनिता पगारे,रामभाऊ गायकवाड,आक्कासाहेब गायकवाड यांच्या तर्फे तथागत बुद्धांचे प्रतिरूप-मूर्ती,संजय निकम,माजी ए.पी.आय बी.जी. भालेराव यांच्या वतीने वाचनालयास खुर्च्या,गोपीचंद केदारे पुस्तके भेट दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी सा.वाचनालय व राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक अभ्यासिका चे संस्थापक प्रा.शरद शेजवळ यांनी केले.सूत्रसंचालन गायत्री खोकले यांनी केले. ह्यावेळी संजय निकम,चंद्रकांत भरीत,धम्ममित्र सुरेकर,प्रा.जनार्धन धनगे, भाऊसाहेब गाडे,संतोष तेलपुरे,विनोद सोनवणे,सविता सोनवणे,छाया जाधव,विश्वास जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक सुरेश खळे,विनोद सोनवणे,विश्वास जाधव,गायत्री खोकले,स्वाती औताडे,बी.डी.खैरनार,वसंत पवार,साक्षी गायकवाड,अक्षय गरुड,सिद्धार्थ गरुड,रवी गरुड,सत्यजित सोनवणे यांनी परिश्रम घेतले.राजरत्न वाहुळ यांनी आभार मानले.