येवला (प्रतिनिधी)
दान पारमिता फाऊंडेशन नाशिक (रजि.) च्या वतीने येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी सार्वजनिक वाचनालय व राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तिभूमी अभ्यासिका यांस स्पर्धा परीक्षा करता उपयुक्त असलेले महत्वपूर्ण ग्रंथ-पुस्तके भेट दिले आहेत. काही दिवसांपूर्वी आयेशा हेमंत मोहोड ह्या सरकारी नोकरीत रुजू झाल्याने त्यांनी त्यांची स्पर्धा परीक्षेची पुस्तके दान पारमिता संस्थेला दान दिली होती. ही पुस्तके दान पारमिता फाऊंडेशनच्या मान्यवर पदाधिकारी, सदस्य यांनी नुकतीच येथे सदिच्छा भेट देऊन मौल्यवान ग्रंथ विद्यार्थ्यांना भेट दिले.
दान पारमिता फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील खरे, सचिव संतोष आंभोरे, अशोकन स्क्रिप्ट इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा रुपाली गायकवाड,सदस्य युवराज वाघ, निलेश खरे,सोनाली निसर्गन, सोनाली वानखेडे,राजू पगारे, रुपाली पगारे,रंजना गायकवाड, काशिनाथ गायकवाड,वैभव जाधव,दिलीप तळेकर यांनी मुक्तिभूमी वाचनालयास ग्रंथ व येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना रोख रक्कम भेट दिली.
मुक्तिभूमी वाचनालय तथा अभ्यासिकेचे संस्थापक शरद शेजवळ, विद्यार्थी गायत्री खोकले,स्वाती अवताडे,मनीषा गरुड,अक्षय गरुड,सिद्धार्थ गरुड रवी गुरुड,उत्कर्ष वाघ,रिजवान शेख यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी फाऊंडेशन चे अध्यक्ष सुनील खरे यांनी फाऊंडेशन करत असलेल्या कार्याचा परिचय करून दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्तिभूमी वाचनालय व अभ्यासिकेचे संस्थापक शरद शेजवळसर,सूत्रसंचालन संचालक राजरत्न वाहुळ,आभार वसतिगृह अधीक्षक बी.डी.खैरनार यांनी मानले.