संगमनेर : महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकोले तालुक्यातील कळसुबाई मंदिर गाभाऱ्यात घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाने मंगलमय वातावरणात विधिवत घटस्थापना केली आहे. या उपक्रमाचे त्याचे हे २६ वे वर्ष असून घटस्थापनेआधी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिदें, कँबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार व नाशिकचे खा. हेमंत गोडसे यांच्या हस्तें या मंगलकलशाचे पुजन करण्यात आल्याची माहिती कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यानी दिली.
मागील २६ वर्षापासून घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाकडून कळसुबाई मंदिरात घटस्थापना केली जात आहे. तसेच वर्षभर याठिकाणी स्वच्छता राखणे, मंदिराला रंगरंगोटी करणे यामध्ये आपला मोलाचा सहभाग नोदंवत आले आहेत. कळसुबाई मित्र मंडळ विविध सामाजिक कार्यात सदैव आग्रभागी राहून सामाजिक दायित्व पार पाडत असल्याने नेहमी त्याचे कौतुक होत असते. मंडळाच्या माध्यमातून जीवनात शारीरिक सुदृढ होण्यासाठी, निर्व्यसनी राहावे यासाठी नेहमी प्रोत्साहन व प्रेरणा दिली जाते.
दरम्यान या उपक्रमात कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, बाळासाहेब गव्हाणे, बाळासाहेब आरोटे, गजानन चव्हाण, अभिजित कुलकर्णी, सोमनाथ भगत, अशोक हेमके, अभियंता मयूर मराडे, प्रवीण भटाटे, बाळासाहेब वाजे, फोटोग्राफर सोपान चव्हाण, गणेश काळे, निलेश पवार, नितीन भागवत, आदेश भगत, भगवान तोकडे, सुरेश चव्हाण, ज्ञानेश्वर मांडे, बाळू भोईर, रोशन लहाने, अवधूत दिवटे, साहिल तूंबारे, संकेत वाडेकर, कु. जान्हवी भोर, कु. चतुर्थी तोकडे, कु. नगमा खलिफा, चि. अर्चित हेमके, कु. यज्ञेश भटाटे, कु. कृष्णा बोराडे, संजय जाधव, शुभम जाधव, भाऊसाहेब जोशी, गुरुनाथ आडोळे, पंढरीनाथ दुर्गुडे, नामदेव जोशी, चंदू लाखे, रमेश हेमके, पुरुषोत्तम बोराडे, कुणाल वाडेकर, उमेश दिवाकर, चेतन जाधव, जन्मेजय चव्हाण, ओमकार गायकवाड यांच्यासह इतर गिर्यारोहक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.