मुस्लिम समाजाचा सामुदायिक विवाह सोहळ्याचा उपक्रम कौतुकास्पद -विवेक कोल्हे  

0

कोपरगाव : दि.१२ डिसेंबर २०२२ :

           लग्न समारंभावर होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देत एकाच मांडवात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथे सौदागर काकर बिरादरी मुस्लिम समाजाने आदर्श पायंडा पाडला आहे. गेल्या दहा वर्षांपासून भोजडे येथे सौदागर काकर बिरादरी मुस्लिम समाजाच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद व आदर्शवत आहे, असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे तसेच अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथे सौदागर काकर बिरादरी मुस्लिम समाजाच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाही हा सामुदायिक विवाह सोहळा आज सोमवारी (१२ डिसेंबर) धार्मिक रिती-रिवाजाप्रमाणे मोठ्या उत्साहात पार पडला. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी या सामुदायिक विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवविवाहित दाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या.

         तसेच दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाबद्दल भोजडे येथील मुस्लिम समाजबांधवांचे अभिनंदन केले. या विवाह सोहळ्यात १२ जोडपे विवाहबद्ध झाले.

याप्रसंगी या विवाह सोहळ्याचे संयोजक बाबा शेख , सलीम शेख, सदरु शेख, सलीम मुसा शेख,शेहरू शेख, मोहसीन सय्यद, बद्रुद्दीन शेख, सिकंदर शेख, इब्राहिम शेख, गुलाब शेख, जावेद शेख, कय्यूम शेख, सलीम शेख, बाबा कालू, जाफर मकबूल, अकबर करीम, इब्राहिम भाई, हसन भाई, ज्ञानेश्वर सिनगर, संजय सिनगर, कैलास धट, रंगनाथ सिनगर, शामराव गिरे, बाळासाहेब सिनगर, पवन सिनगर, नानासाहेब सिनगर, वाल्मिक बोऱ्हाडे, रवींद्र मंचरे, विकास बोर्डे, संतोष बोर्डे, बाबासाहेब बोर्डे, सतीश शेटे, श्रावण बोर्डे, अशोक सिनगर, दीपक मंचरे, प्रमोद सिनगर, सचिन सिनगर, सचिन घनघाव, बाबासाहेब सोनवणे, बाजीराव सिनगर आदींसह मुस्लिम समाजबांधव तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            विवेकभैय्या कोल्हे यावेळी म्हणाले, भोजडे येथील मुस्लिम समाज अतिशय कष्टाळू समाज आहे. लहान-मोठे उद्योगधंदे करून हा समाज उपजीविका करतो. सामाजिक कार्यात हा समाज नेहमी अग्रेसर असतो. भोजडे हे गाव सर्वधर्मसमभाव जोपासणारे गाव म्हणून सर्वदूर परिचित आहे. भोजडे येथील ग्रामदैवत राजा वीरभद्र यात्रोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह, हिंदू-मुस्लिम समाजाचे विविध सण-उत्सव एकत्रितपणे मोठा आनंदात साजरे केले जातात. अशा आदर्श परंपरा जपणाऱ्या भोजडे ग्रामस्थांचे कार्य कौतुकास्पद आहे. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे लग्न समारंभावर होणारा खर्च करणे अनेकांना परवडत नाही. त्यांची ही समस्या दूर करण्यासाठी भोजडे येथील सौदागर काकर बिरादरी मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी पुढाकार घेत सामूहिक विवाह सोहळ्याची संकल्पना राबविली.

          मागील दहा वर्षांपासून भोजडे येथे सौदागर काकर बिरादरी मुस्लिम समाजाच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. अशा उपक्रमामुळे लग्न समारंभावर होणाऱ्या खर्चात मोठी बचत होते आणि समाजबांधव एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण होते. या सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे सौदागर काकर बिरादरी मुस्लिम समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना मोठा आधार मिळाला आहे. समाजात एकोपा राहण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबविणे ही काळाची गरज आहे. अशा प्रकारचे कमी खर्चातील सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन इतर गावातही झाले पाहिजे, असे आवाहनही कोल्हे यांनी केले.

             भोजडे येथे सौदागर काकर बिरादरी मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या परिसरातील हिंदू आणि मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते. धार्मिक रिती-रिवाजाप्रमाणे मोठ्या हर्षोल्हासात हा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या सामुदायिक विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवविवाहित दाम्पत्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here