कोपरगाव (वार्ताहर) :संत नामदेव महाराजांवर पांडुरंगाला नैवेद्य घेऊन जाण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्यातील भाव आणि भक्ती पाहून अक्षरशः पांडुरंगाने नैवेद्याचे सेवन केले असाच भाव, भक्ती भगवंतांचे चिंतन प्रत्येकाने केले भोळ्या श्रद्धेने मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले तर मूर्ती मधील देवत्वाला प्राप्त करता येते असे प्रतिपादन वरद विनायक देवस्थानचे महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांनी केले. ते कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे पुरातन महादेव मंदिर खंडोबा मंदिर व शनी मंदिर येथे मुर्तीं प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात बोलत होते .
महंत दत्तगिरी महाराज, उद्धव महाराज मंडलिक व रघुनाथ महाराज खटाणे, मनसुक महाराज दहे, वैष्णव महाराज जाधव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी सरपंच किरण होन, कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेगाव, माजी उपाध्यक्ष संजय होन, काळे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंदराव चव्हाण, उपाध्यक्ष बोरनारे, माजी उपाध्यक्षअरूणराव येवले, संचालक ज्ञानेश्वर होन, काळे कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण, माजी सरपंच केशवराव होन, राजेंद्र भोईर, रोहिदास होन, अशोकराव होन, भाऊसाहेब होन, किशोर होन, वैष्णव महाराज जाधव, बाळासाहेब गुरसळ, राजेंद्र होन,पाराजी होन, कांतीलाल होन, किरण होन, जयद्रथ होन, शिवाजी जावळे, प्रशांत होन, हरिभाऊ शिंदे, सुधाकर शिंदे, विलास चव्हाण,कल्याण होन,व्ही टी होन, दादासाहेब होन, लक्ष्मण माकोणे,मोहन पवार,धिरज बोरावके, सचिन होन, अर्जून होन, आदी उपस्थित होते.
मंदिर उभारणीसाठी गेल्या तीन वर्षापासून ज्यांनी केस न कापण्याचा पायात चप्पल न घालण्याचा व दुधाच्या पदार्थ सेवन करण्याचा संकल्प केला होता असे मंदिर कृती समितीचे अशोक होन, भाऊसाहेब होन व किशोर होन यांचा संकल्प सिद्धीस गेल्याबद्दल उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला.यावेळी चांदेकसारे परिसरातील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उद्धव महाराजांच्या कीर्तनानंतर आलेल्या सर्व भाविकांना खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला.कालपासून हे मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण जावळे यांनी केले.