उरण दि 22(विठ्ठल ममताबादे ) : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी भारत सरकारच्या ई-श्रम कार्ड ची नोंदणी व नॅशनल पेन्शन योजना (NPS) ची नोंदणी शनिवार दिनांक 24/09/2022 रोजी सकाळी 9.30 ते 5.30 या कालावधीत उरण तालुक्यातील कॉमन सर्विस सेंटर कोप्रोली येथे मोफत आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी या मोफत शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन कॉमन सर्व्हिस सेंटर कोप्रोली -उरण तर्फे करण्यात आले आहे. नोंदणी साठी येताना नागरिकांनी ओरिजनल आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक व कोणताही चालू मोबाईल नंबर घेऊन स्वतः व्यक्ती येणे आवश्यक आहे. आधार कार्ड ला मोबाईल लिंक नसला तरी चालेल. घर कामगार, शेतमजूर, रिक्षाचालक, फेरीवाला, आशावर्कर, अंगणवाडी सेविका, दुकानदार, खाजगी सेवक, इतर असंघटित कामगार यांच्यासाठी या योजना असून शासनाच्या सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा भविष्यात लाभ मिळणार आहे. ई-श्रम नोंदणी केल्यावर पहिल्या वर्षी 2 लाखाचा विमा मोफत मिळणार, नोंदणी केलेल्यांना व्यवसायासाठी लाभ मिळणार व इतर वेळोवेळी अनेक फायदे आपोआप मिळणार आहेत असे विविध फायदे ई श्रम कार्डचे आहेत. याच दिवशी आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती कॅम्प घेतला जाणार आहे. नागरिकांनी ई-श्रम कार्ड व नॅशनल पेन्शन योजना (NPS)चे कार्ड त्वरित काढावेत व भविष्यात कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालिका स्मिता म्हात्रे यांच्याकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी अधिक माहितीसाठी कॉमन सर्विस सेंटर, (CSC) आधार सेंटर, युनियन बँके जवळ, कोप्रोली-उरण. फोन नंबर 9004763339 येथे संपर्क साधावे.
शहरातील उच्चभ्रू आणि दाट लोकवस्ती असलेल्या विजयनगरात डि.पी.उघडाच
नांदेड – मारोती सवंडकर :
येथील विजय नगर भागातील महात्मा फुले प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या परिसरात उघड्या अवस्थेत असलेला...
ख्यातनाम कीर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचा भव्य किर्तन सोहळा संपन्न
नांदेड – प्रतिनिधी :
तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावाचे सुपूत्र तथा पंचायत समितीचे माजी सभापती मोतीराम पाटील मोरे...
सातारा : स्वर्ग यहां नरक यहां.... या न्यायाने परमेश्वर म्हटले की काहीही प्राप्त होत नाही. देशाचे गृहमंत्री ना.अमित शहा यांनी स्वर्गात जाऊन तेथील व्यवस्थेबाबत...