मोरबी : मोरबी इथल्या मच्छू नदीवरील दुर्घटनेप्रकरणी गुजरात पोलिसांनी आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे. राजकोटचे पोलीस महासंचालक अशोक यादव यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली.
भारतीय दंड विधानच्या कलम 304, 308 आणि 114 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांची नावं खालीलप्रमाणे आहेत. 1. दीपकभाई नवीन चंद्र पारेख (वय 44)- ओरेवा कंपनीचे मॅनेजर
2. दिनेश भाई मनसुख भाई दवे- ओरेवा कंपनीचे मॅनेजर
3. मनसुख भाई वालजी टोपिया (वय 59)- तिकीट क्लार्क
4. मदेभाई लाखा भाई सोलंकी- तिकीट क्लार्क
5. प्रकाश भाई लालजी भाई परमार- ब्रिज रिपेअरिंग कॉन्ट्रॅक्टर
6. देवांग भाई प्रकाश भाई परमार (वय 31) ब्रिज रिपेअरिंग कॉन्ट्रॅक्टर
7. अल्पेश गोहिल- सेक्युरिटी गार्ड
8. दिलीप गोहिल- सेक्युरिटी गार्ड
9. मुकेश भाई चौहान- सेक्युरिटी गार्ड
शिवाय या प्रकरणी आता सुप्रीम कोर्ट 14 नोव्हेंबरला सुनावणी करणार आहे. सुप्रीम कोर्टातले वकील विशाल तिवारी यांनी या संदर्भात एक जनहित याचिका दाखल केली आहे. जी सुप्रीम कोर्टानं दाखल करून घेतली आहे. यामध्ये तिवारी यांनी या घटनेच्या न्यायालयीन चैकशीची मागणी केली आहे. तसंच विरोधी पक्षांनीही या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.