संगमनेर : शहरातील साई मंदिराकडे जाणाऱ्या म्हांळुगी नदीवरील तुटलेल्या पुलाची राज्याचे माजी मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काल शनिवारी सकाळी पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना या पुलाची तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या. यावेळी शहराच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांचे सहित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह संगमनेर नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
साईनगर भागातील पुराच्या पाण्यामुळे खचलेल्या म्हाळुंगी नदीवरील पुलाची आमदार बाळासाहेब थोरात यांनी पाहणी केली. तसेच हा पूल तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, नितीन अभंग, शैलेश कलंत्री, गजेंद्र अभंग, सोमेश्वर दिवटे ,अजय फटांगरे, निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, अंबादास आडेप, शेखर सोसे, मुख्याधिकारी राहुल वाघ आदी सह या परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला असून प्रवरा, आढळा व म्हाळुंगी नदीला तीन-चार वेळेस मोठा पूर आला होता. त्यामुळे आढळा आणि म्हाळुंगी नदीतून सातत्याने पाणी वाहत असून गंगामाई घाट-साईबाबा मंदिराकडे जाणारा पूल खचला आहे. हे वृत्त समजताच आ.डॉ. सुधीर तांबे व सौ दुर्गाताई तांबे यांनी पुलाची पाहणी करून या पुलावरील वाहतुकीसाठी काही मर्यादा करण्याच्या सूचना केल्या होत्या. हा पूल साईनगर, गंगामाई घाट या परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगून तातडीने हा पूल दुरुस्त करावा अशा सूचना संबंधित विभागाला माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी दिल्या आहेत.गंगामाई घाटावर शहरातील नागरिकांची मोठी वर्दळ असते तसेच या भागात असलेले ज्युनिअर कॉलेज, साईबाबा मंदिर, स्वामी समर्थनगर येथील नागरिकांकरता हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे.म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने वाहतुकीसाठी या पुलावर काही मर्यादा ठेवल्या असून या पुलाबाबत नागरिकांच्या अडचणी जाणून घेत आ. थोरात यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पूल दुरुस्तीबाबत सूचना दिल्या आहेत. यावेळी साईनगर, स्वामी समर्थनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान तुटलेल्या याा पुलावरून संगमनेर नगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या तीन पाईप लाईन गेलेल्या होत्या मात्र हा पूल तुटल्याने या पाईपलाईन देखील तुटल्याने शहरातील काही भागात पाणीपुरवठा बंद झाला होता मात्र पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने या तीन पाईपलाईन पैकी एक पाईपलाईन तातडीने दुरुस्त करून बंद असलेला पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले तसेच उर्वरित पाईपलाईनचे काम युद्धध पातळीवर सुरू असल्याचे पालिकेतून सांगण्यात आलेे.