यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा येथे यशस्वीरीत्या डबल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सर्जरी..!

0

३२ वर्षीय रुग्णावर अंत्यत जोखमीच्या जटील हृदय शस्त्रक्रियेला यश …!!

नांदेड प्रतिनिधी :

महाधमनी स्टेनोसिस आणि मिट्रल स्टेनोसिस ला प्राणांतिक त्रास होणाऱ्या नांदेड येथील मूळ रहीवाशी असलेल्या ३२  वर्षीय श्री दत्तात्र्यय माजरवाड या रुग्णावर कार्डीयाक सर्जन डॉ.सत्या श्रीधर काळे यांनी यशस्वीरीत्या डबल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सर्जरी पार पाडत रुग्णाला जिवनदान दिले आहे सदर रुग्णावर  ४ वर्षांपूर्वी डबल व्हॉल्व्ह बदलण्यात आले होते त्यानंतर  तो आता चांगले आणि उत्पादकपणे विनाअडथळा आपले कामे करत आहे अशी माहीती हॉटेल चंद्रलोक येथील पत्रकार परिषेदेत देण्यात आली

दत्ता माजरवाड यांना कोरोना काळात अचानकपणे श्वास लागणे, धडधडणे (हृदयाचे ठोके वाढणे), झोपू न शकणे आदी वाढत्या त्रासामुळे ते आमच्याकडे तपासणीसाठी आले आणि ईसिजी, टू-डी इको करून त्यांचे निदान झाले, त्यानंतर आम्ही डिव्हीआर (डबल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट) करून त्याचे ऑपरेशन केले त्यानंतर तो आता पर्यंत चांगली कामगिरी करत आहे असे कार्डीयाक सर्जन डॉ.सत्या श्रीधर काळे यांनी यावेळी नमूद केले

ह्दयाला रक्तपुरवठा करणारा मिट्रल व महाधमनी व्हॉल्ववर होता परिणाम…!

अधिक माहीती देतांना त्यांनी सांगितले की, हृदयामध्ये महाधमनी, मिट्रल, पल्मोनरी ट्रायकस्पिड असे ४  वाल्व्ह असतात सदरील रुग्णास संधिवाता संबंधी हृदयाच्या झडपाचा आजार होता ज्यामुळे त्याच्या मिट्रल, महाधमनी वाल्व्हवर परिणाम झाला होता.

शस्त्रक्रियेदरम्यान आपल्याला हृदय थांबवून नेटिव्ह व्हॉल्व्ह काढून टाकावे लागतात आणि त्याऐवजी यांत्रिक झडप घालावे लागतात व त्यानंतर रुग्णाचे  हृदय रीस्टार्ट करावे लागते व त्यानंतर २ दिवस  आयसीयु  मध्ये आणि ३ दिवस वॉर्डात ठेवल्यानंतर सदरील रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला व पुढील आयुष्य त्याला सामान्यरित्या जगता यावे यासाठी ACITROM सारखी दीर्घ औषधे देण्यात आली आहेत  ..

ह्दयसंबधी काही सामान्य लक्षणे  आढळल्यास त्वरीत तपासणी गरजेची…!

● श्वास लागणे ● थकवा ● अशक्तपणा ● छातीत दुखणे व धडधडणे ● पायांची सूज ● चक्कर येणे ● सायनोसिस ● सतत खोकला ● वजन वाढणे

इमेजिंग आणि प्रयोगशाळेच्या आवश्यक चाचण्या:

टिईई  ● कार्डियाक सीटी स्कॅन ● कार्डियाक एमआरआय

यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा येथील वैदयकीय मदतीबद्दल तेथील जनसंपर्क अधिकारी श्री राम देशमुख ७९९५५०४०२६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

रुग्णाला जीवनदान ः मानले डॉक्टरांचे आभार …!

कोविड काळात आपल्याला अचानकपणे थकवा आणि धाप लागत असल्याकारणाने नांदेड व त्यानंतर हैदराबाद येथे तपासणीअंती ह्दयाच्या मोठ्या आजाराच्या निदानानंतर जगण्याची संपूर्ण आशा माळवली होती परंतु कार्डीयाक सर्जन डॉ.सत्या श्रीधर काळे यांनी मला कोरोनाची लागण झालेली असतांनाही संपूर्ण कोरोना बरा झाल्यावर माझ्यावर ओपन हर्ट डबल व्हॉल्व रिप्लेसमेंट सर्जरी यशस्वीरित्या करून मला जिवनदान दिले आहेत साक्षात त्यांच्या रुपात मला देव भेटला असे मत रुग्ण श्री दत्ता माजरवाड यांनी व्यक्त केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here