सातारा/अनिल वीर : सृजनशीलता अभ्यासापूरती नसून प्रत्येक विषयात महत्त्वाची असते. खेळामुळे खिलाडूवृत्ती निर्माण होते.त्यामुळेच जीवन सुकर होते.शिवाय,यश-अपयश पचविण्याची क्षमता खिलाडूवृत्तीमुळेच निर्माण होत असते.असे प्रतिपादन लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी केले.
येथील औद्योगिक वसाहती मधील लोकमंगल हायस्कूलचे क्रीडा शिक्षक विजय यादव यांची सातारा तालुका शारीरिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिरीष चिटणीस बोलत होते. ते पुढे म्हणाले, “एखाद्या पदावर निवड होणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. खुर्चीवर व्यक्ती बसली की ती खुर्ची आपोआप मोठी होत असते.खुर्चीचा मान वाढत असतो. आजच्या युगात मुलांनी अभ्यासाबरोबर खेळामध्ये सुद्धा मन रंमवले पाहिजे. ज्यांच्याकडे अष्टपैलूपणा आहे. तोच आजच्या युगातील श्रेष्ठ विद्यार्थी बनू शकतो.प्रत्येक शिक्षकाकडे वेगवेगळे गुण आहेत. यादव यांची निवड झाल्यामुळे खेळामध्ये नावलौकिक वाढू शकेल.”
मुख्याध्यापिका नंदा निकम म्हणाल्या, “यादव सरांना संघटनेसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे त्यांनी सोने करावे. ज्याच्याकडे संघटन कौशल्य असते.त्याच्याकडेच वेगवेगळी पदे जातात. सातारा तालुका शारीरिक शिक्षक संघटनेसाठी मोलाचे योगदान मिळेल.”
सदरच्या कार्यक्रमास उदय जाधव ,काका निकम, प्रदीप लोहार, संगीता कुंभार, भास्कर जाधव, वैशाली वाडीले, बाळकृष्ण इंगळे, यश शिलवंत, अभिजीत वाईकर, सतीश पवार, चंद्रकांत देवगड, दत्तात्रय शिर्के व अध्ययनार्थी उपस्थित होते.गुलाब पठाण यांनी सूत्रसंचालन केले.शेवटी प्रतिभा वाघमोडे यांनी आभारप्रदर्शन केले.
फोटो : विजय यादव यांचा सत्कार करताना शिरीष चिटणीस शेजारी मुख्याध्यापिका निकम शेजारी शिक्षक.(छाया-अनिल वीर)