युवा सरपंच कैलास पाटील पुंड यांची जरांगे पाटलांकडे मागणी

0

नांदेड दक्षिण विधानसभा लढविण्याचा व्यक्त केला निर्धार  

नांदेड प्रतिनिधी –

येथील नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील विकासाभिमुख युवा सरपंच अशी ओळख असलेल्या व मराठा आरक्षण लढ्यातील आश्‍वासक चेहरा म्हणून सक्रिय असलेले युवा कार्येकर्ते तथा पुंड पिंपळगाव चे बिनविरोध सरपंच कैलास पाटील पुंड यांनी मराठा आरक्षण संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अंतरवाली सराटी येथे प्रत्यक्ष भेट घेत आपला सामाजिक कार्य अहवाल सादर केला आणि विधानसभा नांदेड दक्षिण -८७  मतदार निवडणूक लढवण्याची ईच्छा व्यक्त केली अशी माहीती सरपंच कैलास पुंड यांनी दिली आहे.

आपल्या विद्यार्थी दशेपासूनच विविध सामाजि चळवळीतील सक्रीय आणि लढवय्या कार्यकर्ता म्हणून कैलास पुंड ओळखले जातात त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींसह स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठा अंतर्गत असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच मराठा आरक्षण चळवळीसाठी स्वतःला झोकून देत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हयात महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे.

एकंदरीत सामाजिक व शेतकरी चळवळीतील योगदान व सक्रिय सहभाग लक्षात घेता आपण नांदेड दक्षिण मतदार संघातून निवडणुक लढविण्याची ईच्छा व्यक्त केली आहे आणि  विधानसभा निवडणुकी संदर्भात मनोज जरांगे पाटील हे येत्या  २९ ऑगस्ट रोजी जो निर्णय घेतील त्या दिशेने कार्य करत आपण कायम सामाजिक कार्यात जरांगे पाटलांन सोबत राहू असा शब्द कैलाश पुंड यांनी यावेळी दिला…

कैलाश पाटील पुंड लढवय्या व चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता ..

कैलास पाटील पुंड हे उच्च शिक्षित युवा कार्येकर्ते असून त्यांचे शिक्षण हे एम.ए.,एम.एड.,एम.फिल झाले आहे ते २०२१ साली नांदेड तालुक्यातील पिंपळगाव (नि), च्या सरपंच पदासाठी बिनविरोध निवडून आले आहेत त्यांनी विविध सामाजिक संघटनेत सक्रिय सहभाग नोंदवतांना संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष, ते विभागीय उपाध्यक्ष असे काम केले आहे त्याबरोबरच त्यांचा शेतकरी व मराठा आरक्षण चळवळीत सतत सक्रीय सहभाग राहीला आहे

यासोबतच त्यांनी स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठात विद्यार्थी चळवळीत सक्रीय सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांचा अनेक प्रश्‍नावर आंदोलने,मोर्चे,निवेदन आणि उपोषणाच्या मार्गाने यशस्वी तोडगा काढत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे स्वा.रा.ती.म. विद्यापीठांतर्गत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मागील अनेक वर्षापासून सतत प्रयत्नशील असतात

,

मराठा आरक्षण चळवळीसाठी मोलाचे योगदान…

आरक्षणा संदर्भात मराठा आरक्षण जनजागृतीसाठी खेडोपाडी प्रत्यक्ष भेटीगाठी देत त्यांनी मराठा समाजात आरक्षणाविषयी जनजागृती करतांनाच अनेक वेळा मोर्च, आंदोलन, रास्ता रोको, मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्‍न व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पिककर्जासाठी येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी मोर्चे व आंदोलने.करण्यासोबतच बागायती शेतकऱ्यांचा विद्युतपुरवठा खंडीत केल्या जाईल तेंव्हा तेंव्हा आंदोलने करुन विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील राहीले आहेत आणि मराठा समाजासाठी सर्वोतपरी प्रगतीसाठी आपण कायम कटीबद्ध आहोत असा शब्द कैलास पाटील पुंड वेळोवेळी देतात .. .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here