येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षासाठी सोडावा! अ‍ॅड. समीर देशमुख

0

येवला प्रतिनिधी :

  येवला तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. समीर देशमुख यांनी शिष्टमंडळासह माजी महसूल मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांची संगमनेर येथे भेट घेतली. यावेळी येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेस पक्षासाठी सोडावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी बाळासाहेब थोरात यांना महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट संसदपटु पुरस्कार राष्ट्रपती द्रोपदी मुरमु यांच्या हस्ते प्रदान झाल्याबद्दल येवला तालुका काँग्रेस कमिटीच्या तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी बाळासाहेब थोरात साहेब यांना लेखक विश्वास पाटील यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर लिखित महासम्राट हे पुस्तक व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

         

तसेच महाराष्ट्र राज्याच्या होऊ घातलेल्या 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षासाठी सोडावा अशा अग्रही मागणीचे निवेदन देण्यात आले. येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असून काँग्रेस विचारांना मानणारा मतदारसंघ आहे. येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाच्या जडणघडणीत काँग्रेस पक्षाची मोलाचे योगदान आहे. महाराष्ट्र राज्याच्या 1999 च्या विधानसभेच्या निवडणुकीत येवला लासलगाव मतदार संघात काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवली होती. सदर निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार फक्त दीडशे मतांनी पराभूत झाले होते. सदरचा पराभव हा तांत्रिक स्वरूपाचा होता. त्यानंतर 2004 च्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी झाली. 1999 च्या विधानसभेच्या निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघात ज्या पक्षाचा उमेदवार निवडून आलेला असेल तेथे त्या पक्षासाठी जागा सोडायची व जेथे जो पक्ष दोन नंबरला असेल तेथे त्या पक्षाला जागा सोडायची असे जागा वाटपाचे सूत्र होते. या सूत्राप्रमाणे 2004 च्या निवडणुकीत येवला लासलगाव मतदार संघावर काँग्रेस पक्षाचा दावा होता अशी परिस्थिती असतानाही 2004 च्या विधानसभा निवडणुकीत येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सोडण्यात आला होता.

काँग्रेस पक्षाने येवला लासलगाव विधानसभा या मतदारसंघातील जागेचा त्याग केला होता.  2004 च्या विधानसभेच्या निवडणुकीत  येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून येण्यास काँग्रेस पक्षाचे मोलाचे योगदान व त्याग होता. परंतु आजमितीस येवला लासलगाव विधान मतदारसंघाचे विद्यमान आमदार छगन भुजबळ हे महायुती सोबत असल्याकारणाने येवला लासलगाव मतदार संघावर काँग्रेस पक्षाचा हक्क आहे. त्यामुळे येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पुन्हा काँग्रेस पक्षाला मिळावा. येवला तालुका काँग्रेस कमिटी तर्फे येवला तालुक्यात विविध उपक्रम तसेच विविध आंदोलनाद्वारे काँग्रेस पक्षाचे संघटन उभे केले आहे. तरी येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेस पक्षाला मिळावा काँग्रेस पक्षाचा उमेदवार निश्चित विजय होईल अशी मागणी येवला तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष एडवोकेट समीर देशमुख यांनी केली. तसेच महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी कडे येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात इच्छुक म्हणून अ‍ॅड. समीर देशमुख यांनी तिकिटाची मागणी केली आहे.

    यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, बळीराम शिंदे, प्रीतम पटणी, अण्णासाहेब पवार, जयप्रकाश वाघ, दत्तू भोरकडे, शिवनाथ खोकले, प्रकाश बोरजे, नाना शिंदे, आशुतोष महाले, चंचल गायकवाड, विराज देशमुख, ऋषिकेश सोमासे, उमेश कंदलकर, ऋषिकेश पवार आदी सह पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here