आमदार दराडे यांच्या मागणीला मंत्री संजय शिरसाठ यांच्याकडून हिरवा कंदील
येवला, प्रतिनिधी
ऐतिहासिक धर्मांतराची घोषणा केलेल्या येवला भूमितील विंचूर चौफुली वरील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा खूप वर्षाचा झाला आहे. या पुतळ्याच्या आजूबाजूचे बांधकाम जुने व जीर्ण झाल्याने पुतळ्यासह परिसराचे सुशोभीकरण करून नव्याने पुतळा स्थापित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार किशोर दराडे यांनी दिली.
सामाजिक न्यायमूर्ती संजय शिरसाठ यांच्याकडे विंचूर चौफुली वरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नवीन पुतळा बसविण्यासह या ठिकाणच्या सुशोभीकरणाची मागणी केली होती.त्याला शासनाने हिरवा कंदील दिला असून याबाबतचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल करण्यात आला आहे. येथील व्यापारी संकुलात मधोमध सद्यस्थितीत पुतळा आहे मात्र अंदाजे ४५ वर्षांपूर्वी हा पुतळा बसविण्यात आलेला होता.परंतु आज नव्याने पुतळा उभारण्याची गरज आहे.

तसेच येथील चौथरा व आजूबाजूचा परिसरही जीर्ण झाला आहे.अनेकदा परिसरात नगरपालिकेने पेवर बसविण्यासह विविध कामे केली.मात्र ती तात्पुरती स्वरूपाची मलमपट्टी ठरत आहे.त्यामुळे पुतळ्यासह संपूर्ण परिसराला नवी झळाली देण्याची गरज असल्याचे आमदार दराडे यांनी श्री. शिरसाठ येवल्यात आले त्यावेळेस निदर्शनास आणून दिले होते.
आजूबाजूचे बांधकाम आहे मोठ्या प्रमाणावर खराब झालेला आहेत तसेच त्याठिकाणी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचते.मुळात ऐतिहासिक धर्मांतराच्या घोषनेची ही भूमी असल्याने या ठिकाणी सतत राज्यभरातून अनुयायी येत असतात.शिवाय शहरातील सर्व राजकीय,सामाजिक उपक्रमांची सुरुवात या पुतळ्याला अभिवादन करूनच होते.विंचूर चौफुलीवर अतिशय मोक्याच्या जागी व दर्शनी भागात असल्यामुळे सातत्याने सदरील पुतळ्याकडे नागरिकांचे लक्ष असते. परंतु स्मारक अतिशय जीर्ण झालेले आहे.

शिरसाठ यांनी या पुतळयाच्या सुशोभिकरणाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या चालू अधिवेशनामध्ये श्री. दराडे यांनी त्याबाबत मागणी करून सदर काम तात्काळ मार्गी लावावे अशी मागणी केली.याबाबत लवकरच आराखडा सादर होऊन मंजुरी मिळणार आहे यामुळे तालुक्यातील दलित बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.या कामाला चालना देण्यासाठी ठोस पाठपुरावा करणार असल्याचे आमदार दराडे यांनी सांगितले.