येवल्यात आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांच्या हस्ते भारतीय अकॅडमीचे १६ नोव्हेंबर २०२४ रोजी उदघाटन

0

येवला (प्रतिनिधी)

फक्त स्पर्धा नाही तर माणूस घडवण्याकडे वाटचाल करणे हे धेय् घेऊन “मी भारतीय प्रथमतः व अंतिमतः ही” हा विचार-संकल्पना घेऊन ग्रामीण,कष्टकरी,शेतकरी-शेतमजूर,उपेक्षित/मागासवर्गीय युवा-युवतींना करिअरच्या संधी-पात्रता निर्माण करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू पाहणाऱ्या भारतीय अकॅडमी,येवलाचा उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वा.येवला एकनाथ खेमचंद कॉम्प्लेक्स दुसरा मजला, स्मार्ट इंडिया कॉम्प्युटर शेजारी, येवला बस स्टॅन्ड समोर,येवला (जि. नाशिक) येथे आंतरराष्ट्रीय क्रीडापटू कविता राऊत यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले असल्याची माहिती भारतीय अकॅडमीचे संचालक राजरत्न वाहुळ यांनी दिली आहे.

   

  ह्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डी.वाय.एस.पी/उप-पोलीस अधीक्षक,नाशिक वासुदेव देसले साहेब,येवला तहसीलदार आबा महाजन साहेब,सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तमभाऊ काबरा उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती निमंत्रक/संचालक प्रा.राजरत्न वाहूळ सर 77093 46730 प्रा.शरद शेजवळ सर यांनी दिली असून प्रशिक्षक ,प्रा.शरद पाडवी,स्वाती औताडे,गायत्री खोकले,मनिषा गरुड,अक्षय गरुड,समाधान निकाळे,सुमित गरुड,अश्विनी सांगळे आदी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here