नांदेड प्रतिनिधी :
नायगांव विधानसभा क्षेत्रातील अनेक वर्षापासून विविध सामाजिक चळवळीत आघाडीवर असलेले तरुण व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे रणजित देशमुख यांनी अंतरवाली सराटी येथे मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांना भेटून नायगाव विधानसभा निवडणुकीसाठी जरांगे पाटील यांच्याकडे मागणी केली आहेयावेळी रणजित देशमुख यांच्यासह हणमंत पाटील शिंदे,गजानन पाटील कदम,सतीश पाटील कदम , बालाजी पाटील धनजकर यांची उपस्थिती होती
विधानसभा उमेदवार अर्जावेळी रणजित देशमुख यांनी आपल्या सामाजिक चळवळीचा आणि कार्याचा लेखा – जोखा जरांगे पाटील यांना यावेळी मांडला तसेच आपल्या उमेदवारीचा उपयोग आपण समाजहितासाठी करू अशी ग्वाही त्यांनी जरांगे पाटील यांना दिली
यावेळी सविस्तर चर्चा झाल आणि विविध समाजाला सोबत घेऊन येणाऱ्या काळात सर्व तरुणाईने कार्य करावे अशी सूचना जरांगे पाटील यांच्याकडून उपस्थित तरुणांना देण्यात आल्याची माहिती भूमिपुत्रानी दिली तसेच,, नायगाव मतदार संघाच्या वतीने एका सामान्य तरुणाला नेतृत्व करण्याची संधी देऊन आशीर्वाद द्यावा अशी विनंती नायगाव च्या भूमिपुत्रा कडून यावेळी जरांगे पाटलांना करण्यात आली…….