कीव्ह : युक्रेनची राजधानी कीव्हवर रशियाने हल्ले केले. त्यात 8 नागरिक मृत्युमुखी पडले, तर 24 जण जखमी झाले आहेत. कीव्ह शहराच्या मध्यवर्ती भागात हे हल्ले करण्यात आले आहेत.
युक्रेनच्या गृहमंत्र्यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली. 6 कारला आग लागली, तर अंदाजे 15 वाहनांचे या हल्ल्यात नुकसान झाले. याआधी, रशियाने युक्रेनच्या दक्षिण भागावर हल्ले तीव्र केले आहेत.
द्वीप्रो आणि झरोपिज्जिया या शहरांवर रशियाने रात्रभर हल्ले केले आहेत. युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटले की, ‘रशियाला आम्हाला पूर्ण उद्ध्वस्त करायचं आहे.’
आमचं अस्तित्व मिटावं म्हणून तो जिवाचा आटापिटा करत आहेत असं झेलेन्स्की यांनी म्हटलं.
युक्रेनची राजधानी कीव्हवर रशियाने हल्ले केले. त्यात 8 नागरिक मृत्युमुखी पडले तर 24 जण जखमी झाले आहेत.कीव्ह शहराच्या मध्यवर्ती भागात हे हल्ले करण्यात आले आहेत.
युक्रेनच्या गृहमंत्र्यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली. 6 कारला आग लागली तर अंदाजे 15 वाहनांचे या हल्ल्यात नुकसान झाले. याआधी, रशियाने युक्रेनच्या दक्षिण भागावर हल्ले तीव्र केले आहेत. द्वीप्रो आणि झपोरिज्जिया या शहरांवर रशियाने रात्रभर हल्ले केले आहेत. युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटले की रशियाला आम्हाला पूर्ण उद्ध्वस्त करायचं आहे.
‘अतिरेकी देशाचं भविष्य’
एका टेलीग्राम पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, “रशिया आम्हाला उद्धवस्त करू पाहातोय. त्यांना पृथ्वीवरून आमचं अस्तित्व पुसायचं आहे. संपूर्ण यूक्रेनमध्ये अलार्म वाजत आहेत.”
कीव्ह व्यतिरिक्त लवीव, द्नीप्रो आणि झपोरिज्जियामध्ये झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख करताना झेलेन्स्की यांनी म्हटलं की, “दुर्दैवाने तिथे लोकांचे मृत्यू झाले आहेत. तिथे लोक जखमी आहेत.” त्यांनी लोकांना आवाहन केलं की त्यांनी बंकरमध्येच राहावं.
यूक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनीकोव्ह यांनी म्हटलं की “शत्रूची क्षेपणास्त्रं आमच्या हिमतीवर मात करू शकत नाहीत. मग भले त्यांनी राजधानीवर का हल्ला केला असेना.”
त्यांनी ट्वीट केलं, “ते काय उद्ध्वस्त करत असतील तर रशियाचं भविष्य, जे बदललं जाऊ शकत नाही. जागतिक स्तरावर सगळ्यांच्या तिरस्काराचा धनी ठरलेल्या अतिरेकी देशाचं भविष्य.”
यूक्रेनवर जे हल्ले होत आहेत त्याबद्दल अजून रशियाकडून काहीही वक्तव्य करण्यात आलेलं नाही.
किव्ह, द्नीप्रो आणि झपोरीज्जियाव्यतिरिक्त यूक्रेनच्या पश्चिम भागातल्या लवीववरही हल्ले झाले आहेत. इथल्या स्थानिक गव्हर्नरांनी टेलिग्रामवर 10 ऑक्टोबरला स्थानिक वेळेनुसार सकाळी याची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की पोलंडच्या सीमेजवळ वसलेल्या या शहरात सकाळी हवाई हल्ले झाले.
त्यांनी म्हटलं की लोकांनी बॉम्ब शेल्टर्समध्ये राहावं आणि बाहेर पडू नये.
कीव्हच्या स्थानिक सैन्य प्रशासनाने म्हटलं की किव्हवर अजूनही हल्ले होत आहेत त्यामुळे लोकांनी बाहेर पडू नये. टेलिग्रामवर दिलेल्या एका संदेशात ओलेक्सी कुलेबा यांनी म्हटलं की हवाई संरक्षण यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. त्यांनी हेही सांगितलं की एअर अलर्ट सिस्टिम अजूनही चालूच आहे. त्यांनी लोकांना आवाहन केलं की ज्या इमारतींवर हल्ला झाला, किंवा जिथे क्षेपणास्त्रं पडली आहेत तिथले फोटो काढू नका किंवा व्हीडिओग्राफी करू नका. “लोकांचे जीव यावर अवलंबून आहेत,” ते म्हणाले.