अहमदनगर प्रतिनिधी (२० ऑक्टोबर):- अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची बदली झाली असून त्यांच्या जागी राकेश ओला अहमदनगरचे नवीन पोलीस अधिक्षक म्हणून यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी ओला यांनी श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. सध्या ते नागपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक म्हणून कार्यरत होते.