सातारा : विजयादशमीच्या मुहूर्तावर राजधानी सातारा शहरात हॉटेल सी गोल्ड रेस्टॉरंट शाखेचा उद्घाटन समारंभ श्रीमंत खा. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.त्यामुळे पाटण येथे चविष्ट असणारा स्वाद अर्थात, खवय्यांचा पॅटर्न सातारा शहरात दरवळणार असल्याच्या प्रतिक्रिया ग्राहक वर्गातून उमटत आहेत.
येथील राधे कॅटर्स हत्तीखाना येथे बंधुत्व पाटणभूषण विजेते नितीन पिसाळ आणि त्यांचे सहकारी वैभव शिंदे-चव्हाण बंधु यांनी धमाकेदार सुरवात केली आहे. पहिल्या ३ दिवसासाठी ऑफर असल्याने ग्राहकांची तुफान गर्दी आढळून आली. काहीजण कुपन घेऊनही दुसऱ्या दिवसाची वाट पहात होते.इतका प्रचंड असा प्रतिसाद मिळत असल्याने भविष्यात बिर्याणीसह इतर खाद्य पदार्थ मिळणार आहेत.
“सातारकरांनी उदंड असा प्रतिसाद बिर्याणी महोत्सवाला दिल्याबद्दल आम्ही सातारावासियांचे खूप खूप आभारी आहोत.इथून पुढे सातारावासियांना आमची सेवा निरंतर मिळणार आहे. याचा सर्व शहरवासियांनी लाभ घ्यावा.” अशीही प्रतिक्रिया सी गोल्ड रेस्टोचे दस्तुरखुद्द नितीन पिसाळ यांनी दिली. पाटणची १०० टक्के चविष्ट गॅरंटी देणारी बिर्याणी राजधानी साताऱ्यात सुरू केली आहे. सी गोल्ड रेस्टॉरंटचे सर्वेसर्वा नितीन पिसाळ यांनी पाटणमध्ये बिर्याणीची चव खवय्यांना दिली आहे. शिवाय,जत्रा थाळीनेही भुरळ घातलेली आहे.विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन समाधान व्यक्त केलेले आहे. तेव्हा राधेय केटरिंगच्या माध्यमातून नव्या खाद्य संस्कृती पर्वाची मेजवणीची सुरुवात झाली आहे. बिर्याणीसह अन्य खाद्य पदार्थांची मांदियाळी मिळणार आहे.
फक्त रु.९९/- मध्ये बिर्याणी मिळणार आहे.विशेष म्हणजे प्रथम ३ दिवस बिर्याणीवर पुलावही फ्री देण्यात आला आला.यापुढेही दरात वाढ होणार नाही.असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
वैभव शिंदे-चव्हाण यांनी स्वागत केले. नितीन पिसाळ यांनी मान्यवरांचा सत्कार केला.विशाल शिंदे-चव्हाण यांनी आभारप्रदर्शन केले.सदरच्या कार्यक्रमास मराठा मोर्चाचे बापू क्षीरसागर,अनिल बोधे,बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर, सूरज कुंभार,सर्जेराव कदम, समीर सैयद,डॉ.किरण जोशी, प्रशांत पोतदार,श्रीमती शेलार, विश्वजित गुजर,जिपचे बर्गे,तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी- पदाधिकारी व खवय्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
फोटो : खा.छ.उदयनराजे भोसले व अनिल वीर यांचा सत्कार करताना नितीन पिसाळ शेजारी शिंदे-चव्हाण बंधुसह मान्यवर.