मैत्रीच्या आठवणी जागवत माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात गुरूंजनांचा सन्मान
येवला, प्रतिनिधी
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा,मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…हे मित्रांचे वर्णन फक्त कवितेतच नव्हे तर वास्तविक जीवनातही तितकेच आल्हाददायक..!जीवनात मित्रांची उणीव भरून काढणे अजून तरी शक्य झालेले नाही म्हणूनच वर्षामागे वर्ष लोटतात पण मित्रांच्या भेटीची ओल मनात कायम असते…याच हेतूने तब्बल २७ वर्षांनंतर राजापूर येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर शाळेतील १९९५-९६ मधील दहावीचे विद्यार्थी स्नेहमेळ्याच्या माध्यामतून एकमेकांना भेटले अन भरली ती आठवणी जागवत अन ऋणानुबंध जपण्याची शाळा…!
काळ कितीही लोटला तरी मैत्रीचे ऋणानुबंध कमी होत नाही..हाच धागा विणत राजापूर विद्यालयातील दहावीचे हे माजी विद्यार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून वीण पुन्हा घट्ट करून आठवणींचे सुवर्ण क्षण,उत्सव मैत्रीचा,सन्मान गुरुजनांचा…या हेतूने एकत्र येऊन २७ वर्षापूर्वीच्या आठवणीत रमले…जेथे ज्ञान मिळाले,जीवनाला दिशा मिळाली त्या शाळेतील शिक्षकांप्रती अभिमान अन कृतज्ञता पुर्वक आदर व्यक्त करण्यासह वेगवेगळया क्षेत्रात नवनवी क्षितीचे पार करणाऱ्या मित्रांची तब्बल २७ वर्षांनी झालेली पुर्नभेट त्यांच्या शाळेच्या आठवणींना उजाळा देणारी ठरली,तशीच भविष्यात पुन्हा पुन्हा एकत्र येण्याची आस लावणारी ठरली.१९९६ नंतर सकाळी त्याच शाळेत आल्यासोबतच मित्रांनी एकमेकांना आलिंगन देऊन अनेक वर्षानंतरची मैत्री किती घट्ट असू शकते याचा प्रत्यय देखील दिला..
सर्वात नाजूक व विश्वासाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे मैत्रीचे कुटुंब..या कुटुंबातील सदस्य वर्षापासून व्हाट्सअपच्या माध्यमातून एकत्रित आले अन आजच्या युगात मैत्री किती घट्ट असू शकते याचा प्रत्यय आणून दिला.आपापल्या व्यवसायाच्या परिचय आपला अनोख्या शैलीत ओळख करून देत कविता,हास्याचे फवारे उडवीत रमले होते. एकमेकांना जपण्यासह अडचणीत मदतीचा हाथ देण्याची ग्वाही सर्वांनी दिली.कुणी शासकीय सेवेत तर कणी बँकेत अधिकारी,शिक्षक सैन्यदलात,व्यापारी,शेतकरी,
कॉन्ट्रॅक्टर,राजकीय,सामाजिक अशा क्षेत्रात कार्यरत असलेल्या मित्रांनी आपली जीवनातील वाटचाल, धडपड,यश तसेच कौटुंबिक माहिती एकमेकांसमोर शब्दबद्ध केली.यावेळी शिक्षकांप्रति आदरभाव दर्शवत तत्कालीन प्राचार्य पांडुरंग विंचू,माधव सानप,धोंडीबा डोंगरे,पोपट आव्हाड, प्रभाकर खाडे,हनुमान बुरुकुल या गुरुजनांचा सन्मान करण्यात आला.
धावपळीच्या जीवनात विद्यार्थी एकमेकाशी नाते जोडून आहेत.सर्व विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात उतुंग यशस्वी असल्याचे ऐकून आनंद झाल्याचे सांगतानाच सत्कार्य,सन्मार्ग व शुद्ध आचरण विसरू नका,आईवडिलांची सेवा करा असा सल्ला यावेळी प्राचार्य विंचू, सानप,डोंगरे,आव्हाड,खाडे या शिक्षकांनी दिला.शिक्षकांची शिस्त,संस्कार व योग्य मार्गदर्शनामुळे आम्ही घडलो.या गुरुजनांनी दाखविलेल्या मार्गावर आमची बॅच घडली अशी कृतज्ञता कृष्णा सोनवने,किरण सानप,संतोष विंचू,मनोज धात्रक,दत्ता सानप,मारोती बोडके आदींनी मनोगतातून व्यक्त केली.प्रस्ताविक व सूत्रसंचालन रामकृष्ण घुगे यांनी केले.प्रदीप आगवण,शिवाजी दराडे,पोपट आगवन,पंकज कोळंबे,संदीप पाटोळे,देविदास सांगळे,राजेंद्र अलगट,शांताराम अलगट,चंद्रकांत सानप,पांडुरंग वाघ,भास्कर जाधव, नारायण वाघ,वाल्मीक वाघ,सुनील गरुड,शरद आव्हाड,किरण जाधव,शरद आगवन,
पंढरीनाथ सोनवणे,संतोष चव्हाण,प्रवीण वाघ,पवन अहिरे,संतोष जाधव,भीमराज अलगट, शरद आव्हाड,शरद मगर,साईनाथ जाधव,वाल्मीक वाघ,शंकर वाघ,खंडू भुरे,बाळू सोनवणे,पल्लवी सातदिवे,कल्पना चौधरी,अनिता सोनवणे, सुनीता सोनवणे,कावेरी दराडे,छाया विंचू,संगीता वाघ, कल्पना दराडे,सविता विंचू,शोभा धात्रक,जयश्री जाधव आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.