मुंबई : मागच्या एक दोन वर्षांपुर्वी ज्याची कधी कल्पना केली नव्हती, ते घडलं. २०१९ च्या निवडणुकीत जनतेने शिवसेना आणि भाजपच्या युतीला स्पष्ट कौल दिला. मात्र मुख्यमंत्री पदावरून भाजप-शिवसेना युतीत बिघाड झाला आणि उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत युती करून सरकार स्थापन केले.
यात भाजपचे १०० पेक्षा आमदार असूनही त्यांना सत्तेपासून दूर राहावं लागलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना सोबत घेऊन सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. या सर्व घटना अभुतपुर्व होत्या. त्यांंचं सर्वांना आश्चर्य वाटलं. त्यातच आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवी आघाडी तयार होईल का ? असं सांगण्यात येत आहे.
राज्यात सध्या महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत विधानसभेत बघायला मिळत आहे. एका बाजूला शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि कॉंग्रेस आहेत. या निवडणुकीचा निकाल येत्या २३ नोव्हेंबरला लागणार आहे. तर दोन्ही बाजूंनी मुख्यमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवे राजकीय समीकरण उदयास येईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादीच्या ४० आमदारांना घेऊन अजित पवार महायुतीत सामील झालेत. तर शरद पवार महाविकास आघाडीत आहेत. यातच शरद पवार किंवा त्यांच्या पक्षातील नेते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उघड उघड टिका करतांना दिसत नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्रित येत सरकार स्थापन करणार अशी चर्चा एका कोपऱ्यात सुरू झाली आहे. मात्र या चर्चेंवर एकनाथ शिंदे यांनी पुर्णविराम दिले आहे.
ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुर्ण बहुमत प्राप्त होईल. अन्य कुठल्याही पक्षासोबत युती करण्याची परिस्थिती आमच्या पक्षावर येणार नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर हे सरकार बनले आहे. अन्य कुणाशी युती करण्याचा प्रश्नच येतन नाही, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मात्र मागच्या निवडणुकीच्या वेळी जे काही घडलं आहे. त्यावरून विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून काय घडू शकते, ? त्यावर काहीही सांगता येऊ शकत नाही. कारण त्याला मागची घटना पुरेशी आहे.
यातच महायुतीत सर्वात जास्त उमेदवार भाजपने उभे केले आहेत. यातच अजित पवार गटाने पन्नासच्या घरात उमेदवार उभे केले आहेत. तर महाविकास आघाडीत शरद पवार गटाने ८७ जागांवर उमेदवार दिले आहेत. यातच दोन्ही आघाड्यांमध्ये मुख्यमंत्री पदावरून भांडणं झाल्यास, एकनाथ शिंदे आणि अजित पवार महायुतीतून बाहेर पडत ते राष्ट्रवादी शरद पवार यांना साथ देतील आणि अडीच अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पदाची विभागणी करतील अशीही चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.