मुंबई : राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यासंबंधित शासन आदेश जारी करण्यात आला आहे. बृहन्मुंबई सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे यांना पदोन्नती मिळाली असून त्यांच्याकडे आता राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
तसंच पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता रितेश कुमार नवे आयुक्त म्हणून काम पाहतील.
मिरा भाईंदरचे पोलिस आयुक्त सदानंद दाते यांची बदली झाली असून ते आता राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाचे अपर पोलिस महासंचालक असतील
विनय कुमार चौबे हे आता पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त असतील. तर अमिताभ गुप्ता हे आता कायदा आणि सुव्यवस्था अपर पोलिस महासंचालक असतील.
विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांची बदली आता नवी मुंबईचे पोलिस आयुक्तपदी झाली आहे. तर वाहतूक पोलिस सह आयुक्त राजवर्धन यांची पदोन्नती झाली असून अपर पोलिस महासंचालक, सुरक्षा महामंडळ या ठिकाणी झाली आहे.