राज्य सरकारी कर्मचारी उद्या पासून बेमुदत संपावर ; माहूर येथील  साडेसहाशे कर्मचारी संपावर जाणार

0
फोटो : माहूर तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी तहसीलदार किशोर यादव यांना संपात सहभागी होणार असल्याचे निवेदन दिले आहे.

माहूर:- जुनी पेन्शन योजना मिळावी म्हणुन सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी ग्रामसेवक व कर्मचारी यांनी त्यांच्या विविध संघटनेच्या माध्यमातून १४ मार्च पासुनच्या बेमुदत संपात सहभागी होणार असल्याचा निर्णय घेतला आहे.सोमवार माहूर येथे विविध कार्यालयात  वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
             सर्वसामान्य कर्मचारी आपल्या आयुष्याची ३० ते ३५ वर्षे सेवा करत असुन त्यांना वृद्धापकाळात पेन्शन नसल्याने व असलेली योजना ही शेअर मार्केटवर आधारीत असल्याने जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत हा संप पुकारला आहे.
         माहूर तहसील कार्यालयात तहसीलदार किशोर यादव यांना महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने संपात सहभागी होणार असल्याचे निवेदन एस. पी. जुकंटवार, एस. एन. पवार, प्रभू पानोडे, डी.बि. पाचपोर, पद्मा निलगिरवार, के.पी. सूर्यवंशी, सुरेश सातपुते, वसंता भवरे, आर. बी. आठवले, डी.बी. पाईकराव, पी.जी. खिल्लारे, वाय. एल. तोडसाम, ओ.बी. मंडपे, कैलास पुसनाके यांनी दिले आहे. तसेच या संपात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा माहुर,महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा माहूर,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा माहूर,या सह विविध संघटना सहभागी झाल्या असून उद्याच्या संपात त्यांचा सहभाग असणार आहे.
        गटविकास अधिकारी यांना महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन  कडून निवेदन ही देण्यात आले असून या निवेदनावर अध्यक्ष व्ही. एस.जाधव,सचिव जी.आर. राठोड,उपाध्यक्ष एस. एस. आळणे,ए.एच.पेंढकर,ए.बी कांउलकर,डी.एस.पवार,एस.एच मार्कंड, एन.एस. देवकते,व्ही.एन. पाईकराव,आर.जी.सरोदे यांच्या सह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
                          जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे तो आमचा अधिकार आहे अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे या मागणी करता मंगळवारपासून सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत या संपात माहूर तालुक्यातील जवळपास साडेसहाशे कर्मचारी प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत तर काही कर्मचाऱ्यांनी व संघटनांनी या संपास पाठिंबा दर्शविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here