रानसई येथे उरण वनविभाग व फ्रेंड्स ऑफ नेचर (FON) तर्फे पाणपक्षी गणना

0

उरण दि २२(विठ्ठल ममताबादे )

रानसई धरण परिसर या ठिकाणी पाणपक्षी गणनेसाठी सहा. वनसंरक्षक, अलिबाग व उरण वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, उरण वनविभाग उरण चे कर्मचारी  ज्ञानेश्वर नामदेव डिविलकर, वनपाल, संतोष बाबाजी इंगोले, वनरक्षक आणि  राजेंद्र शहादेव पवार, वनरक्षक ह्यांच्या सोबत फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्था चिरनेर उरण, रायगड (महाराष्ट्र) नोंदणी क्रमांक एफ-५३५८ (रायगड) संस्थेचे सदस्य निकेतन रमेश ठाकूर व  संदीप विश्वनाथ घरत तसेच पनवेल पोयंजे येथील  यश अरुण शेट्टी ह्या पक्षीनिरीक्षकांनी पाणपक्षी गणना केली.

पक्षी निरीक्षणासाठी सकाळी ७:१५ वाजता सुरवात केली व पक्षी गणना ०८.५४ पर्यंत पक्षी गणना केली. या गणनेमध्ये एकूण  १८ पाणपक्ष्यांसह एकूण ३३ प्रकारच्या प्रजातींचे पक्षी   समूहास सापडले व  त्यांची नोंद ई-बर्ड या ऍप द्वारे करण्यात आली.

 उरण तालुक्यास पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी रानसई हे सर्वात मोठे धरण आहे. या धरणाची जल धारण क्षमता १००० कोटी लिटर म्हणजे १० एम. सी. एम. इतकी आहे. १९७१ साली धरणाची उंची १०० फुट होती. १९८१ साली ती १२० फुट करण्यात आली आहे. धरण लांबी ७७० फुट आहे. धरणाचे क्षेत्र ३७१२ एकर आहे तर बाधित क्षेत्र ३४५० एकर आहे.

रानसई धरणाच्या परिसरात मुबलक पाणी व उत्तम अधिवास (जलाशय व गवती माळरान) उपलब्ध असल्याने तेथील जलाशयात अनेक पक्षी आढळतात. दिनांक १९ जानेवारी २०२५ च्या पक्षी गणनेत ३३ प्रकारच्या प्रजातींचे पक्षी येथे पाहण्यात आले.

ही गणना करताना आव्हाने व अडथळे आढळून आले.जागेवरील वाढता मानवी हस्तक्षेप तसेच खराब व जुनी मासेमारीसाठी वापण्यात आलेले जाळे (घोस्ट नेट) नष्ट करणे.ही आव्हाने व अडथळे आढळून आली.सदर आव्हाने, समस्या वर विविध उपाययोजना सुचविण्यात आले आहे.पाणथळ जागांचे संवर्धनासाठी उपाययोजना करन्यासाठी संबंधित स्थानिक प्रशासनासोबत चर्चा करून संरक्षणाचे धोरण आखणे, पक्ष्यांना बसण्यासाठी उंचवटे तयार करणे,छुपी शिकार रोखणे, मासिक व वार्षिक गणना उपक्रम नियमितपणे राबविणे.असे उपाय योजना या दरम्यान सुचविण्यात आले आहे.

स्थानिक पक्षी निरीक्षक निकेतन रमेश ठाकूर (फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन)),संदीप विश्वनाथ घरत (फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन)),यश अरुण शेट्टी (पोयंजे, पनवेल)तसेच उरण वनविभाग, उरण चे कर्मचारी ज्ञानेश्वर नामदेव डिविलकर, वनपाल,संतोष बाबाजी इंगोले, वनरक्षक,राजेंद्र सहदेव पवार, वनरक्षक यांनी ही गणना केली.गणने नंतरची कार्यवाही म्हणून नोंदी ई-बर्ड व स्थानिक वनाविभागासोबत चेक लिस्ट (फोटोसह) पुढे वरिष्ठाकडे पाठविण्यात आली आहे व अहवाल तयार करून तो वनविभागास सुपूर्त करण्यात आला आहे.अहवालाचा उद्देश पाणथळ जागांमध्ये पाणपक्ष्यांच्या जैवविविधतेची माहिती संकलित करणे, पर्यावरणातील बदल समजण्यासाठी महत्त्वाचा आहे. यामुळे संवेदनशील प्रजातींचे रक्षण, संशोधनाला आधार आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती होते, त्यामुळे सदर पाणपक्षी गणना महत्वाची मानली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here