सेवानिवृत्त प्राचार्याचा अनुभवाचा विद्यार्थ्यांना होणार फायदा.
उरण दि १६(विठ्ठल ममताबादे) : सेवानिवृत्त प्राचार्य सूरदास राऊत, प्राचार्य नाथा नाईक, प्राचार्य दिलीप पाटील, प्राचार्य अरुण घाग व इंजिनिअर बाळकृष्ण पाटील यांचा राम कृष्ण हरी या ग्रुपच्या नावाने एक अनोखी सफर दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ ते १२ डिसेंबर २०२४ अशी एकूण १७ दिवसांची भारतातील पूर्व दक्षिणेकडील विविध राज्यांतील धार्मिक ,ऐतिहासिक ,भौगोलिक, औद्योगिक, ठिकाणांना भेटी देऊन या ग्रुपच्या सदस्यांनी निवृत्तीनंतर जीवनाचा मुक्त आनंद लुटण्याचा प्रयत्न केला प्रवासाची सुरुवात रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेरच्या महागणपतीचे दर्शन घेऊन प्रवासास सुरवात केली.
महाराष्ट्रातील घृष्णेश्वर महादेव मंदिर ,पोहरादेवी, रेणुका माता मंदिर( माहूरगड) चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प. छत्तीसगडमधील भिलाई लोहपोलाद कारखाना ,मैत्री बाग, मल्हारगड (छत्तीसगड).झारखंड मधील बाबा बैजनाथ (देवधर ),वासुकींनाथ धाम. बिहारमधील गया, बोध गया, श्री विष्णुपद वेदी धाम, पश्चिम बंगालमधील गंगासागर, वेल्लूर मठ, व्हिक्टोरिया मेमोरियल, हावडा ब्रिज, काली माता मंदिर, दक्षिणेश्वर काली माता ,कलकत्ता पोर्ट , हल्दीया पोर्ट, ईडन गार्डन, अंडरग्राउंड रेल्वे प्रवास. ओडिसामधील कोणार्क सूर्य मंदिर, चंद्रभागा बीच, गोल्डन बीच, जगन्नाथ पुरी ,लिंगराज मंदिर ,तारातारीणी माता मंदिर, आंध्रप्रदेशातील वराहनृसिहस्वामीमंदिर, कणका दुर्गा माता मंदिर, तेलंगणामधील रामोजी फिल्म सिटी, चारमिनार ,श्रीशैल्यम मल्लिकार्जुन. महाराष्ट्रातील अक्कलकोट, मोरगाव ,जेजुरी मार्गे पर तिचा प्रवास असा एकूण जवळजवळ ६००० कि.मी.एकूण १७ दिवसांचा फोर व्हीलर ने प्रवास करत एकदाही हॉटेलमध्ये कुठलाही पदार्थां न खाता सर्व साहित्य सोबत घेऊन सर्वांच्या परस्पर सहकार्याने जेवण तयार करून एक वेगळा अनुभव घेतला.
१० राज्यांतील प्रवास करून त्या त्या राज्यातील संस्कृतीचा अभ्यास करून प्रवासाची सांगता १२ डिसेंबर २०२४ रोजी पूर्ण करण्यात आली. या संपूर्ण प्रवासाचे नियोजन सूरदास राऊत सरांनी वेळोवेळी व्हाट्सअप ग्रुप वर चर्चा करून केली व इतर सर्वांनी प्रवासाची रूपरेषा आखून प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला.पर्यटन क्षेत्रात करिअर करणाऱ्या तसेच पर्यटन स्थळ विषयी माहिती गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे सेवानिवृत्त प्राचार्य अरुण घाग यांनी सांगितले.