दौड रावणगाव, परशुराम निखळे :
प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत रावणगावातील मंजूर घरकुलांचे भूमीपूजन नुकतेच पार पडले.शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१ते८मार्च या कालावधीत मंजूर घरकुलांचे भूमीपूजन सरपंच सौ.शोभा गावडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी स्वाती लोंढे-चव्हाण यांनी घरकुल बांधकाम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना लाभार्थ्यांना दिल्या.
यावेळी सरपंच शोभा गावडे,उपसरपंच भाऊसाहेब आटोळे,पोपट फाजगे,शोभा आटोळे,उत्तम आटोळे, उपस्थित होते.घरकुल मंजूर असलेल्या पात्र लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र सरपंच गावडे यांच्या हस्ते देण्यात आले.गटविकास अधिकारी प्रशांत काळे,विस्तार अधिकारी लालासाहेब जंजिरे यांनी मार्गदर्शन केले.
१००दिवस कालावधीत घरकुले पूर्ण करावयाची असल्याने शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लवकरात लवकर घरकुले पूर्ण होण्यासाठी ग्रामपंचायतीने नियोजन आखून दिले आहे.त्याप्रमाणे दर मंगळवारी घरकुल बांधकामाचा आढावा घेण्यात येईल. –स्वाती लोंढे–चव्हाण ,ग्रामपंचायत अधिकारी रावणगांव
सर्वच पात्र लाभार्थ्यांनी घरकुल वेळेत बांधून पूर्ण करावे,जेणेकरून अनुदान वेळेत वितरित होऊन त्याचा फायदा लाभार्थ्यांनाच होईल. सौ.शोभा गावडे ,सरपंच रावणगांव