राशिभविष्य/दिनविशेष/पंचांग

0

आजचा दिवस 

This image has an empty alt attribute; its file name is IMG-20250222-WA0003-1-1.jpg

शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर,फाल्गुन कृष्ण प्रतिपदा दु. २ वा. ३४ मि. पर्यंत नंतर द्वितीया, शनिवार, दि. १५ मार्च २०२५, चंद्र – कन्या राशीत, नक्षत्र – उत्तरा स. ८ वा. ५४ मि. पर्यंत नंतर हस्त, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ४८ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ४७ मि.                                                                       

नमस्कार आज चंद्र कन्या राशीत रहाणार आहे. आजचा दिवस चांगला दिवस आहे. आज चंद्र – बुध प्रतियोग, चंद्र – गुरु त्रिकोणयोग व चंद्र – शुक्र प्रतियोग होत आहे. आजचा दिवस वृषभ, मिथुन, कर्क सिंह, कन्या, वृश्चिक, धनु, मकर व मीन या राशींना अनुकूल तर मेष, तुला व कुंभ या राशींना प्रतिकूल जाईल.  

                                         दैनंदिन राशिभविष्य

मेष- मनोबल कमी राहील. अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. खर्च होतील. प्रवास नकोत. मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. दैनंदिन कामे रखडणार आहेत. 

वृषभ- विविध लाभ होतील. संततीसौख्य लाभेल. तुमचा बौद्धिक प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. काहींना विविध लाभ होणार आहेत. 

मिथुन- प्रवास होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. आर्थिक लाभ होतील. मनोबल उत्तम राहील. तुमच्या व्यवसायात तुम्हाला अपेक्षित प्रगती साध्य करता येईल. 

कर्क- जिद्दीने कार्यरत रहाल.आत्मविश्वासपूर्वक कामे पूर्ण कराल. नवा मार्ग दिसेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. 

सिंह- कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. व्यवसायतील आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. काहींना अचानक धनलाभ होईल. 

कन्या- मनोबल वाढेल. गेले दोन दिवस रखडलेली कामे मार्गी लावाल. उत्साही व्हाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. 

तुला- प्रवास टाळावेत. मानसिक अस्वस्थता राहील. महत्वाची कामे नकोत. आरोग्य जपावे. अनावश्यक खर्च वाढणार आहेत. 

वृश्चिक- अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. अपेक्षित गाठीभेटी पडतील. मनोबल वाढेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकणार आहात.

धनु- उत्साह वाढेल. सार्वजनिक कामात सुयश लाभेल. मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण करु शकणार आहात.

मकर- चिंता कमी होतील. सकारात्मक व्हाल. आरोग्य सुधारेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामात सुयश मिळवणार आहात.

कुंभ- मनोबल कमी राहील. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. आरोग्य जपावे. विनाकारण चिंता करण्याचे सोडून द्यावे. 

मीन- उत्साह व उमेद वाढेल. दैनंदिन कामे होतील. तुमचा प्रभाव राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वत्र प्रभाव राहील. 

आज शनिवार, आज सकाळी ९ ते १०.३० यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- 9822303054

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here