आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर,फाल्गुन कृष्ण सप्तमी, शुक्रवार, दि. २१ मार्च २०२५, चंद्र – वृश्चिक राशीत, नक्षत्र – ज्येष्ठा, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ४३ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ४९ मि.
नमस्कार आज चंद्र वृश्चिक राशीत रहाणार आहे. आजचा दिवस ज्येष्ठा वर्ज्य दिवस आहे. आज चंद्र – शनि केंद्रयोग होत आहे. आजचा दिवस वृषभ, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, मकर, कुंभ व मीन या राशींना अनुकूल जाईल तर मेष, मिथुन व धनु या राशींना प्रतिकूल जाईल.
दैनंदिन राशिभविष्य

मेष – आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. मनोबल कमी राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत.
वृषभ – मनोबल व आत्मविश्वास वाढेल. वैवाहिक सौख्य लाभेल. कामाचा ताण कमी होईल. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमचा उत्साह व उमेद वाढेल.
मिथुन –आर्थिक कामात सावधानता हवी. आरोग्य जपावे. वाहने सावकाश चालवावित. दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. महत्त्वाचे निर्णय नकोत.
कर्क – आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. दैनंदिन कामात अनुकूलता लाभेल.सन्ततिसौख्य लाभेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील.
सिंह – प्रवासाचे योग येतील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागणार आहेत. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल.
कन्या – प्रवासाचे योग येणार आहेत. काहींना अनपेक्षितपणे नातेवाईक भेटणार आहेत. चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावणार आहात.
तुला – आर्थिक कामात सुयश लाभेल. मनोबल उत्तम राहील.प्रवासाचे योग येतील. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. कामाचा ताण वाढेल.
वृश्चिक – दैनंदिन कामे यशस्वी होणार आहेत. मनोबल वाढेल. उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहून अनेक कामात सुयश मिळवाल.
धनु – प्रवास शक्यतो टाळावेत. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. मनोबल आत्मविश्वास कमी राहील.
मकर – प्रवासाचे योग येणार आहेत. आर्थिक कामात सुयश लाभेल. जुने मित्रमैत्रिणी भेटतील. कामाचा ताण असला तरी उत्साही रहाल.

कुंभ – आज आपण अत्यन्त उत्साही व आनंदी राहणार आहेत. मनोबल उत्तम राहील. नोकरी, व्यवसायात प्रगती होणार आहे. प्रवासाचे योग येणार आहेत.
मीन – गेले काही दिवस असणारी अस्वस्थता संपणार आहे. उत्साह वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. कामे यशस्वी होणार आहेत.
आज शुक्रवार, आज सकाळी १०.३० ते १२ यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- 9822303054