आजचा दिवस
शके १९४७, विश्वावसुनाम संवत्सर, चैत्र शुक्ल पंचमी, बुधवार, दि. २ एप्रिल २०२५, चंद्र – वृषभ राशीत , नक्षत्र – कृत्तिका स ८ वा. ५० मि. पर्यंत नंतर रोहिणी, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ३३ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ५२ मि.
नमस्कार आज चंद्र वृषभ राशीत रहाणार आहे. आजचा दिवस स. ९ नंतर चांगला दिवस आहे. आज रवि – चंद्र लाभयोग व चंद्र – गुरु युतीयोग होत आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर मिथुन, तुला व धनु या राशींना प्रतिकूल जाईल.
दैनंदिन राशिभविष्य

मेष : कौटूंबिक जीवनात आनंद व समाधान लाभेल. काहींची जुनी येणी वसूल होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. काहींना अनपेक्षितपणे एखादी गुप्तवार्ता समजेल. मनोबल उत्तम राहील.
वृषभ : आज आपला उत्साह विशेष राहील. दैनंदिन तसेच इतर महत्त्वाची कामे आपण मार्गी लावू शकाल. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवास सुखकर होतील.
मिथुन : दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. निरुत्साही रहाल. आज शक्यतो कोणत्याही महत्त्वाच्या कामाचे नियोजन नको. प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी. वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे.

कर्क : काहींना जुने मित्र मैत्रिणींना भेटण्याची संधी लाभेल. उत्साही रहाल. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमचे निर्णय व तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत,
सिंह : मानसिक प्रसन्नता लाभेल. सार्वजनिक व सामाजिक कामात तुमचा विशेष सहभाग राहील. महत्त्वाची कामे मार्गी लावाल. आनंदी व आशावादी रहाल. प्रवास सुखकर होणार आहेत.
कन्या : तुमचा उत्साह व उमेद वाढेल. गेले दोन दिवस रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी संधी लाभेल.
तुळ : मनोबल कमी राहील. आज आपले कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही. एखाद्या बाबतीत तुमचे मन नाराज राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. मानसिक अस्वस्थता राहिल. वाहने जपून चालवावित.
वृश्चिक : मानसिक प्रसन्नता व तुमचा उत्साह वाढविणारी एखादी घटना घडेल. आनंदी व आशावादी रहाल. आज आपण आपली नियोजित कामे वेळेच्या आधी पूर्ण करु शकणार आहात.
धनु : मानसिक अस्वस्थता राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहतील. आजची आपली दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. प्रवास शक्यतो टाळावेत. मनोबल कमी असणार आहे.
मकर : बौद्धिक परिवर्तन होईल. आज आपण आपल्या प्रियजनांबरोबर मनमोकळा संवाद साधाल. आनंदी रहाल. मनोबल वाढेल. साडेसाती संपल्याने स्वतःला अनेक बाबतीत मुक्त अनुभवाल.
कुंभ : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. आनंदी व आशावादी रहाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या मनाची होणारी घालमेल थांबेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
मीन : मानसिक ताणतणाव कमी होतील. तुमच्यावर कामाची जबाबदारी राहील. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. मनोबल उत्तम राहील. मानसिकता सकारात्मकता राहील.
आज बुधवार, आज दुपारी १२ ते १.३० यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- 982230305