आजचा दिवस Today’s Horoscope
शके १९४५, शोभननाम संवत्सर, अश्विन पौर्णिमा, शनिवार, दि. २८ ऑक्टोबर २०२३, कोजागिरी पौर्णिमा, खंडग्रास चंद्रग्रहण, चंद्र – मीन राशीत सकाळी ७ वा. ३१ मि. पर्यंत नंतर मेष राशीत, नक्षत्र – रेवती सकाळी ०७ वा. ३१ मि. पर्यंत नंतर अश्विनी, सुर्योदय- सकाळी ६ वा. ३८ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ०७ मि.
नमस्कार आज चंद्र मीन राशीत सकाळी ७ वा. ३१ मि. पर्यन्त रहात असून नंतर मेष राशीत रहाणार आहे. आज दिवस ग्रहणदिन वर्ज्य दिवस आहे. आजचा दिवस मेष, मिथुन, कर्क, तुला, धनु, मकर , कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर वृषभ, कन्या व वृश्चिक या राशींना प्रतिकूल जाईल.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : आपला उत्साह वाढेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वृषभ : काहींना आरोग्याचा त्रास संभवतो. मन नाराज राहील. आज तुम्हाला काही चिंता लागून राहील. कामामध्ये तुमचे मन लागणार नाही.
मिथुन : आरोग्य उत्तम राहील. काहींना आर्थिक लाभ होणार आहेत. जुने सहकारी भेटतील. मनोबल वाढेल. प्रवास सुखकर होतील.
कर्क : आज तुमचा उत्साह विशेष असणार आहे. आत्मविश्वासपूर्वक कामे कराल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. मनोबल वाढेल.
सिंह : मनोबल वाढणार आहे. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता व आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. कामे मार्गी लागणार आहेत.
कन्या : आज आपणाला कसली न कसली नाराजगी राहील. कामे उरकणार नाहीत. वादविवादात सहभाग नको. खर्च वाढणार आहेत.
तुला : मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान लाभेल. मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्नशील रहाल.
वृश्चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी राहतील. कामाचा ताण राहील. मनोबल कमी असणार आहे. प्रवास टाळावेत. वाहने जपून चालवावीत.
धनु : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुम्ही आपले विचार इतरांना पटवून द्याल. आरोग्य उत्तम राहील. काहींना अचानक धनलाभ संभवतो.
मकर : मानसिक आशावाद वाढेल. व्यवसायात काही अनुकूल बदल करण्याचा विचार करु शकता. काहींचा बौध्दिक प्रभाव वाढेल.
कुंभ : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे पूर्ण करणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना नवा मार्ग दिसेल.
मीन : आर्थिक कामात सुयश लाभेल. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. प्रवास सुखकर होणार आहेत.
आज शनिवार, आज सकाळी ९ ते १०.३० या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, सातारा- ९८२२३०३०५४