आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशी दु ४ वा. ५९ मि. पर्यंत नंतर पौर्णिमा, श्री दत्तात्रेय जयंती, दि. १४ डिसेंबर २०२४, चंद्र – वृषभ राशीत, नक्षत्र – रोहिणी, सुर्योदय- सकाळी ०७ वा. ०५ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ०२ मि.
नमस्कार आज चंद्र वृषभ राशीत रहाणार आहे. आजचा दिवस सायं. ५ पर्यंत चांगला दिवस आहे. आज चंद्र – मंगळ लाभयोग, चंद्र – बुध प्रतियोग, चंद्र – गुरु युतियोग, चंद्र – शुक्र त्रिकोणयोग व चंद्र – शनि केंद्रयोग होत आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर मिथुन, कन्या व धनु या राशींना प्रतिकूल जाईल.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : काहींना अनपेक्षित धनलाभ होणार आहे. आपल्याला कौटुंबिक जीवनाचा आनंद मिळेल. आर्थिक कामे योग्य रीतीने पार पडणार आहेत. कुटूंबातील व्यक्तींसाठी वेळ देऊ शकणार आहात. आनंदी रहाल.
वृषभ : आपले मनोबल वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. आपल्याला मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहणार आहे. आपण आज इतरांना मदत करणार आहात.
मिथुन : आपले कोणीच नाही, ही भावना आज आपल्याला त्रस्त करेल. आज आपण कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करु नये. काहींना नैराश्य जाणवेल तर काहींजण धार्मिक कार्यात रममाण होणार आहेत.
कर्क : मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देणार आहात. आनंदी व आशावादी रहाणार आहात. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. काहींना अनपेक्षितपणे आर्थिक लाभ होणार आहेत. अनेकांचे सहकार्य लाभेल.
सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. आज तुम्ही आपली मते परखडपणाने मांडणार आहात. आपल्या विचारावर ठाम रहाल. आपले मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत.
कन्या : काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागणार आहे. आपले मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आपल्यावर कामाचा ताण राहील मात्र आपण कामे पूर्ण करणार आहात. जिद्दीने कार्यरत रहाल.
तुला : आज आपल्याला मानसिक अस्वस्थता सतावणार आहे. कामामध्ये लक्ष लागणार नाही. आपल्यावर कसलातरी अनावश्यक ताण राहणार हे. मनाविरुद्ध एखादी घटना घडल्याने तुमचे मन नाराज राहील.
वृश्चिक : आज तुमचा सर्वत्र प्रभाव असणार आहे. कामाचा उरक राहील. दैनंदिन कामे सहजपणे पूर्ण होतील. आज तुम्ही विशेष उत्साही रहाल. प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल उत्तम राहील.
धनु : कामाचा ताण जाणवणार आहे. आज तुमचे मन एखाद्या बाबतीत साशंक राहील. अनावश्यक कामात वेळ वाया जात असल्याने आपली चिडचिड होणार आहे. आज शक्यतो प्रवास करण्याचे टाळावे.
मकर : आज आपणाला विविध लाभ होणार आहेत. तुमचे मानसिक व वैचारिक परिवर्तन होणार आहे. आज तुम्ही कामामध्ये व्यस्त रहाणार आहात. काहींना अनपेक्षितपणे धनलाभ होणार आहेत.
कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आज आपण आनंदी व आशावादी राहणार आहात. आपल्यावर असणारी जबाबदारी आज आपण योग्य रितिने पार पाडणार आहात. आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता राहील.
मीन : आज आपल्याला अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. आपले मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आपल्यावर कामाचा ताण राहणार आहे. मानसिक स्वास्थ्य लाभेल. उत्साही व आनंदी राहणार आहात.
आज शनिवार, आज सकाळी ९ ते १०.३० या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४