आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, पौष कृष्ण नवमी, गुरुवार, दि. २३ जानेवारी २०२५, चंद्र – तुला राशीत, नक्षत्र – विशाखा, सुर्योदय- सकाळी ०७ वा. १६ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. २५ मि.
नमस्कार आज चंद्र तुला राशीत रहाणार आहे. आज दिवस वर्ज्य दिवस आहे. आज चंद्र – मंगळ त्रिकोणयोग, चंद्र – बुध लाभयोग, चंद्र – शुक्र त्रिकोणयोग व बुध – मंगळ प्रतियोग होत आहे. आजचा दिवस मेष, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, धनु, मकर व कुंभ या राशींना अनुकूल तर वृषभ, वृश्चिक व मीन या राशींना प्रतिकूल जाईल.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : मानसिक स्वास्थ्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. मानसिकता सकारात्मक असल्याने आज आपण अनेक कामे मार्गी लावणार आहात. प्रवास सुखकर होतील.
वृषभ : खर्च वाढणार आहेत. कामाचा ताण जाणवणार आहे. मनोबल व आत्मविश्वास कमी राहणार आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्य जपावे. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी.
मिथुन : नवे स्नेहसंबंध जुळतील. नवीन परिचय होतील. तुमचा अनेकांशी सुसंवाद राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. बौद्धिक परिवर्तन झाल्याने तुम्हाला विशेष उत्साही वाटेल.
कर्क : कामाचा ताण कमी होईल. मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसीक प्रसन्नता लाभेल.
सिंह : मनोबल उत्तम असणार आहे. स्वास्थ्य लाभेल. प्रवासाकरिता आपल्याला अनुकूलता लाभणार आहे. कामाचा ताण कमी राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अनुकूलता लाभणार आहे.
कन्या : आर्थिक लाभ होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांबरोबर सुसंवाद राहील. स्वास्थ्य व समाधान लाभेल.
तुला : कामाचा ताण कमी होईल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक : मनोबल कमी असणार आहे. खर्च वाढणार आहेत. मानसिक अस्वस्थता राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवण्याची शक्यता आहे. वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी.
धनु : मनोबल उत्तम राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार आहात. प्रवासाचे योग येतील. आर्थिक लाभ होतील.
मकर : स्वास्थ्य व समाधान लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. काहींना आपण करत असलेल्या कामासाठी उचित मानसन्मान लाभेल. प्रावस होतील.
कुंभ : मनोबल व आत्मविश्वास वाढेल. अस्वस्थता कमी झाल्याने तुम्ही तुमच्या कामावर आपले पूर्ण लक्ष केंद्रित करु शकणार आहात. तुमच्या कार्यक्षेत्रात उचित संधी लाभेल.
मीन : मनोबल कमी असणार आहे. काहींना एखादी मानसिक विवंचना राहणार आहे. आपल्या हातून एखादी चूक होण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी.
आज गुरुवार, आज दुपारी १.३० ते ३ यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४