आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, पौष कृष्ण दशमी, शुक्रवार, दि. २४ जानेवारी २०२५, चंद्र – वृश्चिक राशीत, नक्षत्र – अनुराधा, सुर्योदय- सकाळी ०७ वा. १६ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. २६ मि.
नमस्कार आज चंद्र वृश्चिक राशीत रहाणार आहे. आज दिवस वर्ज्य दिवस आहे. आज रवि – चंद्र लाभयोग होत आहे. आजचा दिवस वृषभ, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, मकर, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर मेष, मिथुन व धनु या राशींना प्रतिकूल जाईल.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : आज आपली अनावश्यक चिडचिड होणार आहे. मनोबल कमी राहील. दैनंदिन कामे विलंबाने होतील. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. काहींना एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
वृषभ : मनोबल व आत्मविश्वास वाढेल. गेले दोन दिवस असणारी मानसिक उद्विग्नता कमी होईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. प्रवासात व वाहने चालविताना आनंद लाभणार आहे.
मिथुन : अनावश्यक कामात तुमचा वेळ वाया जाणार आहे. अतिरिक्त व अनावश्यक कामे करावी लागतील. मानसिक उद्विग्नतेमुळे दैनंदिन कामात तुमचे लक्ष लागणार नाही. काहींना अनावश्यक खर्च संभवतात.
कर्क : प्रवासात फायदा होईल. काहींना विविध लाभ होतील. तुमचे आरोग्य व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. कामाचा उरक राहील. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. तुमचा प्रभाव वाढेल.
सिंह : मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमच्या कामाची इतरांवर विशेष छाप पडेल. तुम्ही आपली मते व आपले विचार इतरांना पटवून देऊ शकणार आहात.
कन्या : तुम्ही आत्मविश्वासपूर्वक कार्यरत रहाणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील.
तुळ :आर्थिक कामात तुम्हाला विशेष फायदा होणार आहे. व्यवसायातील जुनी येणी वसूल होतील. तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे तुम्हाला अपेक्षित सहकार्य लाभेल. आनंदी व आशावादी असणार आहात.
वृश्चिक : मनोबल वाढणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुमच्या कामात तुम्ही बारकाईने लक्ष देणार आहात. उत्साहाने व विशेष उमेदीने कार्यरत रहाणार आहात. दैनंदिन कामे होतील.
धनु : मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागणार आहे. दैनंदिन कामे रखडणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. काहींना एखादी चिंता सतावेल तर काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
मकर : आर्थिक लाभ होतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव असणार आहे. कामाचा ताण वाढणार आहे, मात्र तरीही तुम्ही उत्साहाने कार्यरत असणार आहात. प्रवास सुखकर होतील.
कुंभ : सार्वजनिक कामात तुम्ही उत्साहाने सहभागी होणार आहात. कामे यशस्वी होतील. आरोग्य उत्तम असणार आहे. मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल. स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे.
मीन : मनोबल उत्तम असणार आहे. काहींना अनपेक्षित धनलाभ संभवतो. प्रवासात आनंद मिळेल. नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील. स्वास्थ्य व समाधान लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात.
आज शुक्रवार, आज सकाळी १०.३० ते १२ यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४