राशिभविष्य/दिनविशेष/पंचांग

0

आजचा दिवस 

शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, पौष कृष्ण एकादशी, षटतिला एकादशी, शनिवार, दि. २५ जानेवारी २०२५,  चंद्र – वृश्चिक राशीत, नक्षत्र – ज्येष्ठा, सुर्योदय- सकाळी ०७ वा. १५ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. २७ मि.                                                                       

नमस्कार आज चंद्र वृश्चिक राशीत रहाणार आहे. आज दिवस ज्येष्ठा वर्ज्य दिवस आहे. आज चंद्र – गुरु प्रतियोग, चंद्र – शुक्र केंद्रयोग, चंद्र – शनि केंद्रयोग व शुक्र – मंगळ त्रिकोणयोग होत आहे. आजचा दिवस वृषभ, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, मकर, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर मेष, मिथुन व धनु या राशींना प्रतिकूल जाईल. 

                                         दैनंदिन राशिभविष्य

मेष  : मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी. मानसिक अस्वस्थता असणार आहे. एखादी चिंता दिवसभर आपल्या डोक्यात घर करून राहील. 

वृषभ : तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. मानसिक प्रसन्नता लाभेल. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार आहे. वैवाहिक सौख्य लाभेल. 

मिथुन : खर्च वाढतील. मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागेल. तुमच्या मनावर कसलेतरी अनामिक दडपण राहील. अनावश्यक विचार मनस्वास्थ्य लाभू देणार नाहीत. शांत व संयमी रहावे. 

कर्क : बौद्धिक क्षेत्रात तुमची प्रगती होणार आहे. मानसिक स्वास्थ्य लाभेल. व्यवसायात वाढ करु शकणार आहात. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. 

सिंह : मनोबल उत्तम असल्याने आज आपली अनेक कामे आपण मार्गी लावू शकणार आहात. प्रवास सुखकर होतील. मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल. तुमचा प्रभाव राहील. 

कन्या : जिद्दीने कार्यरत रहाल. मनोबलाच्या जोरावर काम करत रहाल. नातेवाईकांच्या सहकार्याने एखादा प्रश्न मार्गी लावू शकणार आहात. प्रवास सुखकर होतील. भाग्यकारक अनुभव येईल.  

तुळ :कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. काहींना अनपेक्षितपणे एखादी बातमी समजेल. प्रवास सुखकर होतील.

वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहील. आज सर्वत्र तुमचा प्रसन्न वावर राहील. वैवाहिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभेल. मानसिक प्रसन्नता देणारी आनंददायी घटना घडेल. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील.

धनु  : मनोबल कमी असल्याने कामात लक्ष लागणार नाही. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. प्रवास शक्यतो टाळावेत. आज आपल्याला आत्मविश्वासाची कमी जाणवणार आहे.

मकर : जुन्या आठवणींत रममाण व्हाल. काहींना आर्थिक लाभ होतील. विविध लाभ होतील. आज तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. प्रवासाचे योग येणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.

कुंभ : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. मानसिक प्रसन्नता देणारी घटना घडेल. प्रवासासाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. 

मीन : मनोबल वाढेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून गेले काही दिवस रखडलेली कामे पूर्ण करु शकणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील. 

आज शनिवार, आज सकाळी ९ ते १०.३० यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here