राशिभविष्य/दिनविशेष/पंचांग

0

आजचा दिवस 

शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, फाल्गुन शुक्ल एकादशी, आमलकी एकादशी, सोमवार, दि. १० मार्च २०२५, चंद्र – कर्क राशीत, नक्षत्र – पुष्य, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ५२ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ४६ मि.                                                                       

नमस्कार आज चंद्र कर्क राशीत रहाणार आहे. आजचा दिवस स. ८ नंतर चांगला दिवस आहे. आज चंद्र – बुध त्रिकोणयोग, चंद्र – गुरु लाभयोग, चंद्र – शुक्र त्रिकोणयोग होत आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, तुला, वृश्चिक, मकर व मीन या राशींना अनुकूल तर सिंह, धनु व कुंभ या राशींना प्रतिकूल जाईल. 

                                     

   दैनंदिन राशिभविष्य

मेष : एखादी आनंददायी घटना घडेल. मनोबल वाढविण्यासाठी आवश्यक गोष्टी कराल. कामाचा उरक असणार आहे. प्रवास सुखकर होतील.

वृषभ : चिकाटी उत्तम राहील. हाती घेतलेली कामे यशस्वी कराल. उचित मार्गदर्शन लाभेल. मनोबल उंचावेल. काहींना प्रवास करावा लागेल.

मिथुन : कौटुंबिक जीवनात आनंद लाभेल. काहींची आर्थिक कमाई उत्तम होईल. जुनी येणी वसूल होतील. आरोग्य उत्तम राहील.

कर्क : कालच्यापेक्षा आजचा दिवस चांगला जाईल. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करणार आहात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. 

सिंह : आज काहींना नैराश्य जाणवेल. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. कामे लक्षपूर्वक करावीत. काहींना आराम करावा वाटेल तर काहीजण मनोरंजनासाठी खर्च करतील.

कन्या : जुन्या आठवणींना उजाळा द्याल. मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष द्याल. संतती सौख्य लाभेल. मनोबल उत्तम राहील.

तुला : कामाचा ताण कमी होईल. तुमचा उत्साह विशेष असणार आहे. मनोबल उंचवणार आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृश्चिक : काहींना सुखद अनुभूव येतील. मानसिक उद्विग्नता कमी होईल. गेले दोन दिवस राहिलेली कामे पूर्ण कराल. मनोबल उत्तम असणार आहे.

धनु : आरोग्य जपावे. आरोग्याच्या तक्रारी त्रास देणार आहेत. आत्मविश्वास कमी असणार आहे. वाहने सावकाश चालवावीत. उदासीनता राहील.

मकर : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक सौख्य लाभेल. महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल. तुमची दिनचर्या आनंदी राहील.

कुंभ : कोणताही ताण घेऊ नये. अतिविचार करणे थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत. अनावश्यक कामात वेळ  वाया जाईल.

मीन : काहींची बौद्धिक चमक राहील. विविध लाभ होणार आहेत. मनोबल वाढेल. प्रियजनांचा सहवास लाभेल.

आज सोमवार, आज सकाळी ७.३० ते ९ यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- 9822303054

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here