आजचा दिवस
शके १९४५, शोभननाम संवत्सर, मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशी, प्रदोष, रविवार , दि. २४ डिसेंबर २०२३, चंद्र – वृषभ राशीत, नक्षत्र – कृत्तिका, सुर्योदय- सकाळी ०७ वा. ०९ मि. , सुर्यास्त- सायं. ६ वा. ०७ मि.
नमस्कार आज चंद्र वृषभ राशीत रहाणार आहे. आजचा दिवस कृत्तिका नक्षत्र वर्ज्य दिवस आहे. आज रवि -चंद्र षडाष्ट्कयोग, रवि – शनि लाभयोग व चंद्र – शनि केन्द्रयोग होत आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर मिथुन, तुला व धनु या राशींना प्रतिकूल जाईल.
दैनंदिन राशिभविष्य todays horoscope
मेष : कौटुंबिक वातावरण उत्साहाने भरलेले असणार आहे. आनंदी व आशावादी रहाल. काहींना अचानक धनलाभ होईल.
वृषभ : मनावर असणारा ताण कमी होणार आहे. आज आपले आरोग्य उत्तम राहील. प्रवासास दिवस अनुकूल आहे. एखाद्या घटनेनंतर मानसिक प्रसन्नता लाभेल.
मिथुन : कामाचा ताण रहाणार आहे. मनोबल कमी राहील. काहींना आराम करावा वाटेल, तर काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कामामध्ये लक्ष लागणार नाही.
कर्क : मानसिक प्रसन्नता लाभेल. आज तुम्ही उत्साही व आनंदी असणार आहात. मनोबल उत्तम राहील. नवीन परिचय होणार आहेत.
सिंह : मानसिक उत्साह प्रचंड राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
कन्या : मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता संपणार आहे.
तुला : मनोबल कमी राहील. काहींना आत्मविश्वासाचा अभाव जाणवेल. कामे रखडतील. काही अनपेक्षित अडचणी समोर उभ्या राहतील.
वृश्चिक : आरोग्य सुधारणार आहे. मनोबल उत्तम राहील. खर्च कमी होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्नशील रहाल.
धनु : यशस्वीपणे कामे पूर्ण करण्याची तुमची मनीषा असेल, मात्र मध्येच एखादी अडचण येणार आहे. कामे रखडणार आहेत. महत्त्वाची कामे आज नकोत.
मकर : संतति सौख्य लाभेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहणार आहे. कामाचा ताण कमी होणार आहे. काहींना विविध लाभ होणार आहेत.
कुंभ : मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आरोग्य उत्तम राहील. कामाचा ताण कमी होणार आहे.
मीन : जिद्दीने कामात सुयश मिळवाल. आपली मते स्पष्ट व परखड असणार आहेत. मानसिक ताकदीने पुढे जाणार आहात. प्रवासाचे योग संभवतात.
आज रविवार, आज दुपारी ४.३० ते ६ या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, सातारा- ९८२२३०३०५४