आजचा दिवस
शके १९४५, शोभननाम संवत्सर, मार्गशीर्ष कृष्ण द्वितीया सकाळी ८ पर्यंत नंतर तृतीया, शुक्रवार , दि. २९ डिसेंबर २०२३, चंद्र – कर्क राशीत, नक्षत्र – पुष्य, सुर्योदय- सकाळी ०७ वा. १२ मि. , सुर्यास्त- सायं. ६ वा. ०९ मि.
नमस्कार आज चंद्र कर्क राशीत रहाणार आहे. आजचा दिवस वर्ज्य दिवस आहे. आज रवि – चंद्र षडाष्ट्कयोग व चंद्र – गुरु केन्द्रयोग होत आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन, कर्क,कन्या, तुला, मकर व मीन या राशींना अनुकूल तर सिंह, धनु व कुंभ या राशींना प्रतिकूल जाईल.
दैनंदिन राशिभविष्य DAILY HOROSCOPE
मेष : मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे. मन आनंदी राहील. आज तुमची सर्वसमावेशक वृत्ती राहील. सामंजस्य राहील. प्रवास सुखकर होणार आहेत.
वृषभ : तुमच्या कर्तृत्वाला सुसंधी लाभणार आहे. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रवासाचे अनपेक्षित योग संभवतात. उचित मार्गदर्शन लाभेल. नातेवाईक भेटतील.
मिथुन : आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. मात्र, आर्थिक व्यवहारात सावधानता हवी. प्रवासात काळजी घ्यावी. कौटुंबिक जीवनात मतभेद संभवतात.
कर्क : मनोबल व आत्मविश्वास कायम ठेवावा लागेल. मानसिक स्वास्थ्य कमी राहील. एखादी चिंता लागून राहील. प्रवासात व वाहने चालविताना दक्षता हवी. शांत व संयमी राहून कार्य पार पाडावीत.
सिंह : मानसिक दृष्ट्या कमकुवत राहणार आहात. आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. प्रवासात व वाहने चालवताना काळजी घ्यावी. एखादी अनपेक्षित अडचण संभवते.
कन्या : आर्थिक लाभ होतील. प्रियजन व मित्र मैत्रिणी याबरोबर किरकोळ मतभेद संभवतात. महत्त्वाचे निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत. कामाचा ताण राहील.
तुळ- नोकरी, व्यवसायातील कामे लक्षपूर्वक करावीत. कामे मार्गी लावू शकाल. जिद्दीने कार्यरत रहाल. मानसिक ताकदीच्या जोरावर कार्यरत रहाल. प्रवासात काळजी घ्यावी.
वृश्चिक : उत्साह व उमेद वाढेल. कामाचा ताण कमी होईल. गेले दोन दिवस रखडलेली कामे मार्गी लावाल. हितशत्रूवर मात कराल.
धनु : आर्थिक कामे पूर्ण होतील. एखादी चिंता सतावेल. कामे मार्गी लागणार नाहीत. अडचणी जाणवतील. वादविवादात सहभाग टाळावा. मानसिक तणाव राहील. प्रवास टाळावेत.
मकर : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. मनोबल कमी राहील. आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. कामाचा ताण राहील. प्रवासात काळजी घ्यावी.
कुंभ : अनावश्यक कामात वेळ व पैसा खर्च होणार आहे. मनोबल कायम ठेवावे. हितशत्रूवर मात करु शकाल. कामाचा ताण जाणवणार आहे. वाहने सावकाश चालवावित.
मीन : महत्त्वाचे निर्णय टाळावे. मुलामुलिंच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे. प्रियजनाबरोबर मतभेद संभवतात. आर्थिक कामात दक्षता हवी. प्रवासात काळजी घ्यावी.
आज शुक्रवार, आज सकाळी १०.३० ते १२ या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, सातारा- ९८२२३०३०५४