राशिभविष्य /पंचांग /दिनविशेष Horoscope

0

आजचा दिवस Today’s Horoscope

शके १९४५, शोभननाम संवत्सर, पौष कृष्ण द्वितीया, रविवार , दि. २८ जानेवारी २०२४, चंद्र – सिंह राशीत, नक्षत्र – मघा दुपारी ३ वा. ५३ मि. पर्यंत नंतर पूर्वा, सुर्योदय- सकाळी ०७ वा. १५ मि. , सुर्यास्त-   सायं. ६ वा. २८ मि. 

नमस्कार आज चंद्र सिंह राशीत रहाणार आहे. आजचा दिवस चांगला दिवस आहे. आज रवि – चंद्र षडाष्टकयोग, चंद्र – गुरु त्रिकोणयोग, चंद्र – शुक्र त्रिकोणयोग, चंद्र – शनी प्रतियोग, शुक्र – गुरु त्रिकोणयोग व शुक्र – शनि लाभयोग होत आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, तुला, वृश्चिक, धनु, कुंभ व मीन राशींना अनुकूल तर कन्या, मकर व मीन या राशींना प्रतिकूल जाईल. 

           दैनंदिन राशिभविष्य Today’s horoscope

मेष : आपले विचार स्पष्टपणे मांडू शकणार आहात. प्रवास सुखकर होतील. नवीन परिचय होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल.

वृषभ : प्रवास सुखकर होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान आपल्याला मनाला लाभणार आहे. आनंदाने व आशावादीपणाने कार्यरत रहाणार आहात. 

मिथुन : जिद्दीने कार्यरत राहून अनेक कामात सुयश मिळवणार आहात. अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. काहींना एखादा भाग्यकारक अनुभव येईल. 

कर्क : आर्थिक लाभाच्या घटना घडणार आहे. मानसिक स्वास्थ्य लाभेल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल.

सिंह : अस्वस्थता संपणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. अनेक कामात अनुकूलता लाभणार आहे. दैनंदिन कामे विनासायास होणार आहेत.

कन्या : दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. काहींना मानसिक अस्वस्थता लाभणार आहे. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. महत्त्वाचे निर्णय आज नकोत.

तुला : काहींना जुने मित्रमैत्रिणी भेटल्याने आनंद होणार आहे. प्रवासाचे योग येतील. काहींचा बौध्दिक प्रभाव वाढेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

वृश्चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील.   मनोबल व आत्मविश्वास वाढेल. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. प्रवास सुखकर होणार आहेत. 

धनु : काहींना एखादा भाग्यकारक अनुभव येईल. प्रवास सुखकर होणार आहेत. जिद्दीने कार्यरत रहाल. काहींना नातेवाईक भेटणार आहेत.

मकर : मनोबल कमी राहील. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे.  महत्त्वाची कामे आज नकोत. प्रवासात अडचणी जाणवणार आहेत. 

कुंभ : वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान लाभेल. कामाचा ताण राहील. मानसिक अस्वस्थता कमी होईल. दैनंदिन जीवनात एखादा आनंदी अनुभव येईल. 

मीन : कामे लक्षपूर्वक करावीत. काहींना विनाकारण एखादा मनस्ताप संभवतो. मानसिक स्वास्थ्य कमी राहील. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. 

आज रविवार, आज दुपारी ४.३० ते ६ या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय,    सातारा- ९८२२३०३०५४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here