राशिभविष्य /पंचांग /दिनविशेष

0

आजचा दिवस Today’s Horoscope

शके १९४५, शोभननाम संवत्सर, अश्विन शुक्ल अष्टमी, रविवार, दि. २२ ऑक्टोबर २०२३, दुर्गाष्टमी, महाअष्टमी उपवास, चंद्र – मकर राशीत, नक्षत्र – उत्तराषाढा, सुर्योदय- सकाळी ६ वा. ३६ मि. , सुर्यास्त-   सायं. १८ वा. १० मि. 

नमस्कार आज चंद्र मकर राशीत रहाणार आहे. आजचा दिवस सकाळी ९ नंतर चांगला दिवस आहे.  आजचा दिवस मेष, वृषभ, कर्क, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर व मीन या राशींना अनुकूल तर मिथुन, सिंह व कुंभ या राशींना प्रतिकूल जाईल.

दैनंदिन राशिभविष्य

मेष : मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागणार आहे. मन शान्त व संयमी ठेवावे. कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणं टाळावे. 

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. तुम्ही आपली मते सकारात्मक पणे पटवून द्याल.

मिथुन : अनावश्यक गोष्टीत आपला अमूल्य वेळ वाया घालवू नये. मानसिक अस्वस्थता असली तरी शान्त रहावे. काहीचा अध्यात्मिक व धार्मिक गोष्टीत सहभाग राहिल.

कर्क : अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. काही जण बौद्धिक कार्य करणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. प्रवास होतील.

सिंह : मन आनंदी व आशावादी असल्याने अनेक कामे होणार आहेत. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढणार आहे.

: जिद्द वाढणार आहे. चिकटीने प्रयत्न करत रहाणार आहात. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना भाग्यकारक अनुभव येणार आहेत.

तुला : आर्थिक कमाई होईल. मनोबल उत्तम राहील. कौटुंबिक सुसंवाद राहील. एकूणच आजचा दिवस आनंदी असणार आहे.

वृश्चिक : कामाचा उरक राहील. अनेक कामे मार्गी लावणार आहात. तुमचा प्रभाव राहील. सर्वत्र आनंदीपणाने वावर राहील. चिंता कमी होतील.

धनु : काहींची अध्यात्मिक प्रगती होईल.धार्मिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल. दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत.

मकर : नवीन परिचय होतील  व त्याचा फायदा होईल. काहींना शेअर्सच्या माध्यमात फायदा होईल. आर्थिक लाभ होतील. मन आनंदी राहील. 

कुंभ : हळूहळू तुमची वाटचाल सकारात्मक कडे होणार आहे. चिंता,दुःख विसरुन कामाला लागाल.मनोबल उत्तम राहील.

मीन : कामे मार्गी लागतील. प्रवासाचे अनपेक्षितपणे योग येतील. नातेवाईक भेटतील. आनंदी रहावे. मनोबल उत्तम राहणार आहे. 

आज  गुरुवार, आज दुपारी१.३० ते ३ या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय,    सातारा- ९८२२३०३०५४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here