राशिभविष्य /पंचांग /दिनविशेष

0

आजचा दिवस

शके १९४५, शोभननाम संवत्सर, कार्तिक कृष्ण तृतीया दुपारी २ वा. २६ मि. पर्यंत नंतर चतुर्थी, संकष्ट चतुर्थी, गुरुवार , दि. ३० नोव्हेंबर २०२३, चंद्र – मिथुन राशीत, नक्षत्र – आर्द्रा दुपारी ३ वा. ०१ मि. पर्यंत नंतर पुनर्वसु,  सुर्योदय- सकाळी ६ वा. ५६ मि. , सुर्यास्त-   सायं. १७ वा. ५८ मि. 

नमस्कार आज चंद्र मिथुन राशीत रहाणार आहे. आजचा दिवस दुपारी २ नंतर चांगले दिवस आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कन्या, तुला, धनु, मकर , कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर कर्क, वृश्चिक व मकर या राशींना प्रतिकूल जाणार आहे.

           दैनंदिन राशिभविष्य Today’s horoscope

मेष– कामाचा ताण कमी राहील. उत्साही रहाल. उमेद वाढेल. छोटे प्रवास होतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काहींना भाग्यकारक अनुभव येतील. 

वृषभ– कामाचा उरक राहील. आर्थिक कामात सुयश लाभेल. मनोबल उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मिथुन– आनंदी रहाणार आहात. कामाचा ताण कमी होईल. तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

कर्क– काहींना अनावश्यक कामे करावी लागतील. प्रवास नकोत. मनोबल कमी राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता राहील.

सिंह– मनस्वास्थ्य उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. मनोबल उत्तम राहील. महत्त्वाचे निर्णय घ्याल. आरोग्य उत्तम राहील.

कन्या–  दैनंदिन कामात सुयश लाभेल. आरोग्य उत्तम राहील. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रवास सुखकर होतील. 

तुला– कामे मार्गी लागणार आहेत. उत्साह वाढेल. आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढेल. प्रवास होतील.

वृश्चिक– खर्च होतील. वाहने सावकाश चालवावित. अतिउत्साहिपणा टाळावा. मनोबल कमी राहील.

धनु– प्रवास होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. आर्थिक लाभ होतील.

मकर– विनाकारण खर्च संभवतात. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी.

कुंभ– आनंदी रहाणार आहात. प्रियजन भेटतील. आर्थिक लाभ संभवतात. नवीन परिचय होतील. मनोबल उत्तम राहील.

मीन– कामे यशस्वी होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य सुधारेल. प्रवास होतील. मनोबल वाढेल.

आज गुरुवार, आज दुपारी १.३० ते ३ या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय,    सातारा- ९८२२३०३०५४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here