राशिभविष्य /पंचांग /दिनविशेष

0

    आजचा दिवस

शके १९४५, शोभननाम संवत्सर, कार्तिक कृष्ण अष्टमी, कालभैरव जयंती, कालाष्टमी, मंगळवार , दि. ५ डिसेंबर २०२३, चंद्र – सिंह राशीत, नक्षत्र – पूर्वा,  सुर्योदय- सकाळी ६ वा. ५९ मि. , सुर्यास्त-   सायं. १७ वा. ५९ मि. 

नमस्कार आज चंद्र सिंह राशीत रहाणार आहे. आजचा दिवस चांगला दिवस आहे. आज रवि -चंद्र केन्द्रयोग व शुक्र – शनि त्रिकोणयोग होत आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, तुला, वृश्चिक, धनु व कुंभ या सर्व राशींना अनुकूल तर कन्या, मकर व मीन या राशींना प्रतिकूल जाईल.

           दैनंदिन राशिभविष्य Today’s horoscope

मेष  : तुमचा बौद्धिक प्रभाव राहणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. अपेक्षित गाठीभेटी घेण्यास आजचा दिवस विशेष अनुकूल आहे. प्रियजनांचा सहवास लाभेल. आर्थिक लाभ होतील.

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहणार आहे. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहील.

मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित सुसंधी लाभणार आहे. मनोबल उत्तम राहील. जिद्दीने कार्यरत राहून कामे मार्गी लावू शकणार आहात. काहींना नवा मार्ग दिसेल.

कर्क : मनोबल उत्तम राहील. कौटुंबिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. काहींना गुप्त वार्ता समजतील. महत्त्वाच्या आर्थिक कामात सुयश लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत.

सिंह : चिकाटीने कार्यरत राहणार आहात. मनोबल उत्तम राहील. प्रवासाचे योग येणार आहेत. आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. तुमचा प्रभाव असणार आहे. प्रवासाचे योग येतील.

कन्या : आज तुम्हाला कोणत्याही कामात रस वाटणार नाही. काहींना नैराश्य जाणवेल. अनावश्यक कामे त्रासदायक होतील. खर्च वाढणार आहेत. मानसिक अस्वस्थता राहील.

तुळ : काहींना विविध लाभ होतील. अपेक्षित गाठीभेटी पडतील. नवीन परिचय होतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. मित्रमैत्रिणींचे व सहकार्‍यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : मनोबल उत्तम राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. चिकाटीने कार्यरत राहू शकणार आहात. मानसिक अस्वस्थता संपेल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहणार आहे.

धनु  : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना अनपेक्षित प्रवास करावा लागणार आहे. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकणार आहात. प्रवासाचे योग येतील.

मकर : कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे.  मनोबल कमी असणार आहे. महत्त्वाची कामे शक्यतो आज नकोत. काहींना दैंनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. आरोग्याच्या तक्रारी राहतील.

कुंभ  : वैवाहिक सौख्य लाभणार आहे. मनोबल उत्तम राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. तुमचे मन नाराज राहणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहणार आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

आज मंगळवार, आज दुपारी ३ ते ४.३० या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय,    सातारा- ९८२२३०३०५४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here