उरण दि २५(विठ्ठल ममताबादे ) : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी कार्यरत असलेल्या व महिलांचे संघटन करून महिलांच्या विविध समस्यावर उपाययोजना करून जनजागृती करणाऱ्या राष्ट्रीय नारी शक्ती महिला संघटन व ट्रस्ट असोसिएशनच्या वतीने रोडपाली, कळंबोली, नवी मुंबई येथे विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय नारी शक्ती महिला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आरती बेहरा यांनी रोडपाली येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी मंदा वानखेडे राष्ट्रीय नारी शक्ती सचिव उपस्थित होत्या.या प्रसंगी विविध पदावर महिला कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली. यावेळी मंदा वानखेडे
समीक्षा पागम यांची नवी मुंबई अध्यक्ष पदी, शोभा गायकवाड यांची नवी मुंबई उपाध्यक्ष पदी, भारती श्रीराम नवी मुंबई ऑटो रिक्षा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सदर प्रसंगी महिलांचा सर्वांगीण विकास व हक्क यावर राष्ट्रीय नारी शक्ती महिला संघटना व ट्रस्ट असोसिएशन तसेच सरकार कसे काम करत आहे याबाबत माहिती देऊन महिलांचे प्रबोधन करण्यात आले.कार्यक्रमात महिलांचे आरोग्य विषयी निलांबरी मॅडम व सुदाम मोरे यांनी माहिती दिली. यावेळी ज्ञानेश्वर पंढरीनाथ सोनावणे राष्ट्रीय नारी शक्ती सचिव, ट्रस्ट असोसिएशन यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी कोकण अध्यक्ष सुरेश वारेकर, एक्साईड बॅटरीचे युनियन लीडर रविंद्र पाटील,राजेंद्र घरत, सुनीता सोनावणे यांची प्रमुख उपस्थिती होती.राष्ट्रीय नारी शक्ती महिला संघटन व ट्रस्ट असोसिएशनच्या माध्यमातून दरवर्षी रोडपाली, कळंबोली, नवी मुंबई येथे महिला मेळावा असतो. याही वर्षी सदर मेळावा मोठया उत्साहात संपन्न झाला.उत्तम अनुभवी व महिला समस्येच्या जाणकार असलेल्या राष्ट्रीय अध्यक्ष आरती बेहरा यांनी केलेल्या मार्गदर्शन मुळे महिलांमध्ये जनजागृती होऊन अनेक महिला स्वतःच्या पायावर उभे राहत आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमामुळे महिला मध्ये मोठया प्रमाणात जनजागृती होत आहे असे राष्ट्रीय नारी शक्ती संघटनेचे सचिव ज्ञानेश्वर सोनावणे यांनी सांगितले.या कार्यक्रमात ४०० ते ५०० महिला भगिनी उपस्थित होत्या.तिळगुळ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.