राष्ट्रीय व राज्य स्तरावर संविधान साक्षरता व संवर्धन अभियान राबवा : अध्यापकभारती

0

भारतीय संविधान सभे समोर मसुदा मांडला त्यास ४ नोव्हेंबर रोजी होताय ७५ वर्षे 

येवला :      

       दिनांक ४ नोव्हेंबर १९४८ साली भारतीय संविधान सभेच्या मसुदा समितीने भारतीय राज्य घटनेचा मसुदा घटना समिती समोर मांडला त्यास येत्या दिनांक ४ नोव्हेंबर २०२३ रोजी ७५ वर्षे होत आहेत,त्याचे औचित्य साधून देश व राज्यभरात  राष्ट्रीय व राज्य स्तरावर संविधान साक्षरता व संवर्धन अभियान राबवावे अशी मागणी राष्ट्रीय बालक-विद्यार्थी, पालक,शिक्षक,शिक्षण-प्रशिक्षण संस्था Adhyapak Bharti अध्यापकभारती व राष्ट्रीय संविधान साक्षरता-संवर्धन अभियानचे निमंत्रक तथा प्रवर्तक शरद शेजवळ यांनी केंद्र व राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे केली आहे.

भारत सरकार व महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंतर्गत गांव पातळी पासून ते सर्व शासकीय-निमशासकीय सर्व विभागात दिनांक ४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२३ संविधान सन्मान मास (महिना) आयोजन करून संविधान साक्षरतेकरीत विविध प्रबोधनात्मक उपक्रम-कार्यक्रम आयोजित करावेत.केंद्र व राज्य सरकारच्या विविध शासकीय संस्था यांच्यामार्फत संविधान प्रचार- प्रसार व संवर्धन या हेतूने संविधान साक्षरता संवर्धन अभियान आयोजित करावे. भारतातल्या प्रत्येक राज्यात हे अभियान गावपातळी पासून तर त्या त्या राज्यातल्या सर्वोच्च शासकीय-निमशासकीय संस्था स्तरापर्यंत संविधान सन्मान करण्यासाठी केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या *बार्टी,महाज्योती, सारथी* इ. संस्था त्याचप्रमाणे राज्य व देशातील सर्व विद्यापीठे, धार्मिक तसेच अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था, सर्वच शासकीय निमशासकीय संस्थांना संविधान सन्मान तथा संविधान साक्षरता संवर्धन अभियान अंतर्गत उपक्रमात संविधान प्रचार-प्रसार,साक्षरता,संवर्धन करण्यासाठी व्याख्याने,परिसंवा, चर्चासत्र,परिषदा स्पर्धा परीक्षा, मेळावे,कार्यशाळा,गटचर्चा, पथनाट्य,सांस्कृतिक अंगाने संविधान मूल्य विचार प्रचार प्रसार व संवर्धन भारतीय संविधान उद्देशिका वाचन सर्व प्रकारच्या शासकीय निमशासकीय कार्यालयात दर्शनी भागात संविधान उद्देश पत्रिका प्रदर्शित करणे, लोकगीते,कीर्तन, पोवाडा,भारुड यामधून संविधान प्रचार प्रसार संवर्धन व साक्षरता उद्भोधन वर्ग आयोजित करावेत.अशी मागणी केंद्र व राज्य सरकार यांस निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.सदर निवेदन भारताचे महामहिम राष्ट्रपती,प्रधानमंत्री,संसदीय कार्यमंत्री,सामाजिक न्याय मंत्री,

सर्व सन्मानीय सदस्य लोकसभा व राज्यसभा (भारत सरकार) तसेच महामहिम राज्यपाल,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,शालेय शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य,सर्व कुलगुरू केंद्रीय व राज्य विद्यापीठे,महासंचालक बार्टी,महाज्योती,सारथी तसेच लोकसभा,राज्यसभेचे विरोधी पक्ष प्रमुख सन्मानीय सदस्य यांना ही पाठविण्यात आले असल्याची माहिती शरद शेजवळ यांनी दिली आहे. निवेदनावर शरद शेजवळ,प्रा.महेंद्र गायकवाड,प्रभाकर मासुळ सुभाष वाघेरे,शैलेंद्र वाघ,वनिता सरोदे-पगारे,प्रा.के.एस केवट आदींच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here