देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी घाटात दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील पाच दरोडेखोरांना सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडले उर्वरीत चार दरोडेखोर अंधाराचा फायदा घेवून पळून जाण्यात यशस्वी झाले आहे.पकडलेल्या पाच दरोडेखोरांकडून सुमारे एक लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी येथिल घाटात दरोडेखोरांची टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना समजली होती.मिळालेल्या माहितीच्या अधारे राञी 12;30 वा.पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचारी पाठविण्यात आले. घाटातील काटवणात नऊ दरोडेखोरांची टोळी सावज शोधण्यासाठी दबा धरुन बसली होती.राहुरी पोलिसांनी या दरोडेखोरांच्या टोळीवर झडप घातली.दरोडेखोरांची टोळीचा सिनेस्टाईल पाठलाग करुन पाच दरोडेखोरांना पकडण्यात आले.उर्वरीत चार दरोडेखोर अंधाराचा फायदा घेवून पळून जाण्यात यशस्वी झाले.
पकडलेल्या पाच दरोडेखोरांच्या टोळीची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात असलेल्या मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. विशाल सुभाष बर्डे यांच्या ताब्यातील 25 हजार रुपये किंमतीची एक काळ्या रंगाची विना नंबरची बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल व त्याचे कमरेला लोखंडी सत्तुर मिळून आला.
संदीप दिगंबर माळी यांच्या ताब्यातील 15 हजार रुपये किंमतीची काळ्या पांढऱ्या रंगाची एक हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल नंबर एम एच 17 एक्स 694 याचे कडे मिळून आली. तसेच त्याचे डाव्या खिशात मिरचीची पूड मिळून आली. तसेच त्याचे पाठीमागे बसलेला सागर अशोक बर्डे याचे पॅंटीचे उजव्या खिशात चाव्याचा जुडवा जुडवा मिळून आला 20 हजार रुपये किमतीची एक बजाज कंपनीची प्लेटिना मोटरसायकल नंबर एम एच 17 एक्स 6039 व 40 हजार रुपये किंमतीची होंडा कंपनीची काळ्या रंगाची शाईन मोटार सायकल नंबर एम एच 17 ए डब्ल्यू 5291बाजूला काटेरी झुडपात लपून ठेवलेली आढळून आली.असा एकुण एक लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला
राहुरी पोलिसांनी पो.काँ.सचिन विठ्ठल ताजणे यांच्या फिर्यादी वरुन दरोडेखोरांच्या टोळीतील विशाल सुभाष बर्डे (वय 19),संदीप दिगंबर माळी (वय 20),सागर अशोक बर्डे (वय 22),भोंद्या उर्फ रवींद्र सूर्यभान माळी,अर्जुन भास्कर माळी ( सर्व रा. बारागाव नांदूर ता. राहुरी) अंधाराचा फायदा घेवून पळून गेलेल्या चार अशा नऊ जणां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलीस निरीक्षक प्रताप दराडे
व पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे यांनी घटनास्थळी भेट दिली.त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा हे तपास करीत आहे.