रिपब्लिकन पक्षाच्या सातारा शहर कार्याध्यक्षपदी सुशांत तुपे

0

 सातारा/अनिल वीर : रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा कार्यालयाच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सुशांत तुपे यांना शहर कार्याध्यक्षपदी नियुक्तीपत्र देण्यात आले.

       शहरातील प्रत्येक झोपडपट्टी विभागांमध्ये तसेच दलित वस्त्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता उभा करण्याचे काम तुपे आणि राजेंद्र होटकर (शहराध्यक्ष) यांच्याकडे आहे.इतर सर्व पदाधिकारी त्यांना सहकार्य करणार आहेत. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता प्रत्येक झोपडपट्टी उपनगर तसेच शहरातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये उभा राहिला पाहिजे. रिपब्लिकन पक्ष हा धर्म निरपेक्ष  आहे. कोणत्याही जातीवादी पक्षाबरोबर त्याची युती नाही. ज्यांनी संविधान संपवण्याची भाषा करतात बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करतात. अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून आम्ही कदापी बसणार नाही. असे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी स्पष्ट केले आहे.ते पुढे म्हणाले,पक्षाचे सर्वेसर्वा दीपकभाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची विचारधारा तळागाळातील बहुजन समाजाच्या घराघरात पोहोचवण्याची हमी आहे. पक्षाची एकनिष्ठ राहून तन मन धन राखुन  काम केले पाहिजे.यावेळी जिल्हा संघटक सागर फाळके, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कांबळे, वाहतूक आघाडीचे राजेश ओव्हाळ,राकेश जाधव, विकास आवळे, राजेंद्र सावंत,बबलू वायदंडे, अक्षय बनसोडे, सिद्धांत गायकवाड इत्यादी कार्यकर्ते – पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here