बुलडाणा,(प्रतिनिधी)- केंद्रीय सामाजीक न्यायराज्य मंत्री भारत सरकार तथा रिपाई राष्ट्रीयध्यक्ष डॅा. रामदास आठवले यांची जाहीर सभा मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील प्रवेश व्दार असलेल्या मलकापूर येथे दिनांक ८ एप्रील २०२५ रोजी लायब्री मैदानावर जाहीर होणार आहे. त्या सभेची तयारी व नियोजन करण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील सर्व रिपाई आठवलेंचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासदांच्या उपस्थीतीत बैठक संपन्न झाली. अध्यक्षस्थानी जिल्हासंपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव होते.
या बैठकीमध्ये जाधव यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना सभेच्या तयारीसाठी आजच कामाला लागा अशा सूचना दिल्या . या बैठकीचे नियोजन व प्रस्तावीक व सुत्रसंचलन बुलडाणा तालुखाध्यक्ष केशव सरकटे यांनी केले तर आभार प्रदर्शन चिखली तालुखाध्यक्ष हिम्मतराव जाधव यांनी केले. या बैठकीत जिल्हा भरातील रिपाईचे पदाधिकारी, कार्यकर्ते व आठवले साहेबांनवर प्रेम करणारे मोठ्या असंख्येने उपस्थीतीत होते.
यावेळी मुख्यमार्गदर्शक जिल्हाध्यक्ष दक्षिण इंजिनियर शरद खरात, उत्तरचे जिल्हध्यक्ष भाऊसाहेब सरदार, जिल्हाकार्यध्यक्ष प्रा.मुक्तार पठाण, महीलाध्यक्ष वंदनाताई वाघ, जिल्हा महासचिव पॅंथर निळकंठ दादा सोनोने, जिल्हायुवाध्यक्ष प्रकाश पाटील म्हस्के,जिल्हा अल्पसंख्य आघाडी दक्षिण जिल्हाध्यक्ष नबाब मिर्झा बेग, जिल्हा युवाध्यक्ष उत्तर मंगेश मेढे, अल्पसंख्यचे जिल्हाध्यक्ष उत्तरचे शेख वहिद शेख सलीम, विदर्भ महीलाउपाध्यक्षा आशाताई वानखडे, महीलाजिल्हाध्यक्षा उत्तर रोहीणी कबीरदास, जिल्हाउपाध्यक्ष सर्वश्री भगवानराव इंगळे, दत्ता पाटील राहणे, इंजिनियर राजेश सरकटे, संतोष झनके, भाऊसाहेब वानखडे, सुनिल इंगळे, जिल्हसचिव विलास गव्हांदे, जिल्हासंघटक जयपाल मोरे उत्तर, डॅा. बबन परमेश्वर, बुलडाणा जिल्हासंघटक ग.ग.इंगळे, मेहकर विधानसभा प्रमुख डॅा.सुखदेव कांबळे,प्रसिध्द प्रमुख बाबूराव निकम,जिल्हा सदस्य किसन तायडे, सर्वश्री तालुखाध्यक्ष जळगांव जामोद संतोषराव वानखडे, बुलडाणा केशव सरकटे, चिखली हिम्मतराव जाधव, देऊळगाव राजा प्रकाश मुखदयाल, शेगाव सुरज शेगावकर, मलकापूर दिलीप इंगळे, मोताळा बाळासाहेब आहिरे, सिंदखेड राजा रमेश पींपळे, मेहकर राणा मोरे, नांदुरा शैलेश वाकोडे, खामगाव मनोज धमेरिया, संग्रामपूर बाबूलाल इंगळे,बुलडाणा तालुखा महीलाध्यक्ष उषाताई इंगळे, रूपालीताई कांबळे, बुलडाणा तालुखाउपाध्यक्ष भास्करराव जाधव, अमर तायडे जळगांव जामोद सचिव, सिंदखेडराजा विजय भालमोडे, अमोल तायडे, सुर्यभान तायडे, महादेव तायडे, मेहकर शहरध्यक्ष मा. नगरसेवक शेख सलीम इत्यादीनी मलकापूरची ८ एप्रीलची जाहीर सभा कसी भव्यदिव्य ऐतीहासीक कसी होईल यासाठी आप आपले विचार मांडले व तनमनधनाने ही आपल्या लाडक्या नेत्यांची जाहीर सभा कसी भव्यदिव्य होईल यावर सविस्तर मार्गदर्शन केले.