येवला प्रतिनिधी :
स्वरिप च्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.शहरातील मुख्य भाग म्हणून ओळखला जाणारा लक्कडकोट परिसरात सध्या गटारीच्या अतिशय दुर्गंधीयुक्त पाणी तेथील चेंबर चोकअप झाल्यामुळे परिसरात डासाचे व किड्यांचे प्रमाण भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत साधारण आठ ते दहा लोकांना डेंगू सारख्या गंभीर आजाराची लागण झाली आहे कित्येक लोकांना थंडी तापाने ग्रासले आहे.
शाळेतील मुलांना त्या पाण्यातून जावे लागते ही फार मोठी शोकांतिका आहे त्या ठिकाणी आई तुळजाभवानीचे मंदिर व मुस्लिम बांधवांसाठी मज्जित असल्यामुळे दोन्हीही धर्मातील लोकांना धार्मिक विधी पूजा पाठासाठी मंदिरात जावे लागते धार्मिक स्थळाच्याच बाजूला उघड्यावर साचलेले गटारीचे सांडपाणी त्यामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे नागरिकांनी नगरपालिकेला तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी तोंडी व लेखी स्वरूपात सांडपाणी संदर्भात सांगितले होते मात्र दोन्हीही विभागाने एकमेकांवर बोट दाखवत उडवा उडवीची उत्तरे देऊन त्यांच्या म्हणण्याला व निवेदनाला केराचे टोपली दाखवलेली आहे म्हणून साहेब आपण त्यात तात्काळ लक्ष घालून अतिशय गंभीर स्वरूपाचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आम्हाला स्वारीपच्या वतीने मा.महेंद्रभाऊ पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र स्वरूपाच्या आंदोलन छेडण्याची वेळ येऊ देऊ नये याची नोंद घ्यावी .