सातारा,जे.सदानंद : महायुतीच सरकार सत्तेत आल्यानंतर आता राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी सूरू केली आहे. सरकार अर्जाची छाननी करणार हे पाहता आता तब्बल 4 हजार महिलांनी अर्ज मागे घेतले आहेत.
विशेष म्हणजे हे अर्ज दंडाच्या भितीपोटी मागे घेतल्याची माहिती आहे. तसेच सरकार प्रशासन स्तरावरही अर्जाची छाननी कशी करतेय? कोणत्या निकषावर लक्ष केंद्रीत केले जातेय? यासह ही अर्जाची छाननी कशी सूरू आहे? हे जाणून घेऊयात.
महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. “लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी सुरू झाली आहे. आम्ही पडताळणी सुरू केली आहे. ज्यांमध्ये असं आढळून आलं आहे की, काही महिला या लाभार्थी असून त्यांचे अर्ज चुकीच्या पद्धतीने भरले आहे. काही जणांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. काही जणी आधीच दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहे आणि आता लाडक्या बहिणींचा सुद्धा हफ्ता घेत आहे. घरात दुचाकी किंवा चारचाकी आहे. अशा लाडक्या बहिणींनी स्वत:हुन मिळालेला लाभ परत देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली.
‘मागील महिन्यात काही महिलांनी पैसे परत केले आहे. डिसेंबरमध्ये काही पैसे जमा झाले आहे. ते सरकारी चलान म्हणून स्वीकारले जात आहे. ते पैसे सरकारच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या जानेवारी महिन्यात सुद्धा काही महिलांनी लाडक्या बहिणीचे पैसे परत केले आहे’ असंही तटकरेंनी सांगितलं.
इन्कम टॅक्स, परिवहन विभागाकडून माहिती मागवणार
‘3500 किंवा 4 हजार असतील, त्याची प्रक्रिया सुरू आहे. डिसेंबर महिन्यात काही लाडक्या बहिणींनी पैसे परत केली. आता जानेवारी महिन्यात हजारो महिलांनी पैसे परत केले आहे. जसं जसं त्या ठिकाणी लक्षात येईल, तशी प्रक्रिया सुरू आहे. लाडक्या बहिण योजनेची पडताळणी ही परिवहन विभाग, इन्कम टॅक्स विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. ही कायम स्वरुपात सुरू आहे. त्यामुळे काही महिलांनी स्वत: हून पैसे परत देण्यास सुरुवात केली आहे. ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. ज्या महिला लाडक्या बहिणींसाठी पात्र नसतानाही लाभ घेतला असेल त्याबद्दल संबंधित विभागाकडून पडताळणी सुरू आहे’ असंही तटकरेंनी स्पष्ट केलं.
पडताळणी कशी होणार?
पिवळ्या, केशरी रेशनकार्डधारक महिलांनाच मिळणार लाभ’
नमो शेतकरी सन्मान योजनेतील महिलांना केवळ 500 रुपयेच मिळणार
संजय गांधी निराधार योजनेतील महिलांना पूर्णपणे वगळणार
हस्तांतर योजनेशी संलग्न खात्यातून वसूल करण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं