लोकसभेत सत्ताधारी गटाचा पराभव होताच नगर- मनमाड महामार्गाचे काम पडले बंद …

0

देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे 

              लोकसभेची निवडणूक संपली आता मतदारांची पाच वर्षांनी गरज लागणार आहे.नगर मनमाड महामार्गावर तुम्ही कुञ्या सारखे मेले तरी आम्हाला काही देणे घेणे नाही.हेच तर राजकीय नेत्यांना वाटत नसेल ना ? कारण हि तसेच घडले आहे.निवडणूक संपताच त्यात सत्ताधारी गटाच्या दोन्ही जागा विरोधकांच्या ताब्यात गेल्याने निवडणूक निकाला नंतर अवघ्या दोन दिवसात नगर- मनमाड महामार्गाचे काम बंद पडले. महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार महामार्गावर काम करणाऱ्या सर्व मशिनरी अचानक गायब केल्या आहेत. हे नक्कीच आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट म्हणावी लागेल. लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर येताच महामार्गाचे काम बंद झाले.हे काम कोणी बंद केले हे जनतेच्या लक्षात आले आहे.तुमच्या हातात सत्ता असली तरच विकास कामे सुरु ठेवायची का?असा सवाल जनतेने केला असुन जनता कुञ्या सारखी मेली तरी चालेल हे तर राज्यकर्त्यांना मतदारांना महामार्गाचे काम बंद करुन सुचवायचे तर नाही ना? 

              नगर मनमाड दुरुस्ती लढा नगर मनाडसाठी या राजकारणा विरहित संघटनेने अनेक आंदोलने केली. अधिकाऱ्यांचा दशक्रियाविधी घालण्यात आला.हजारो आंदोलने केल्या नंतर महामार्गाच्या कामाला सुरवात झाली होती.गेल्या अनेक वर्षापासून

काम रखडलेला नगर-मनमाड महामार्गचे कामाची निविदा निघुन प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली होती. महामार्गाची कामाची सुरवात नगरकडून झाली होती. ठेकेदाराने महामार्ग अनेक ठिकाणी खोदून ठेवला. त्यामुळे अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक करण्यात आली.या महामार्गावर शिर्डी शिंगणापूर सारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवस्थान आहेत. त्यामुळे भाविकांच्या वाहनाची मोठी वर्दळ असते.तसेच आंध्र व तामिळनाडूसाठी हा मधला मार्ग असल्याने मोठ्याप्रमाणात जड व अवजड वाहनाची वर्दळ असते. याच महामार्गावरून जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांच्या गळीत हंगामात उसाची वाहतूक केली जाते. या महामार्गाच्या क्षमते पेक्षा वाहतूक जास्त असल्याने कायमच वाहतूकीची कोंडी होते.

                  पावसाळ्यात या महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने डांबरीकरण होऊन मोठ मोठी खड्डे पडले आहेत.या खड्ड्यामुळे अनेक अपघात होत आहेत.महामार्गाच्या कामात हलगर्जीपणामुळे शेकडो प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. तर शेकडों लोकांना कायमचे अपंगत्व आले आहे. लोकसभा निवडणूकीचे बिगूल वाजताच या महामार्गाचे काम जोमात सूझाले होते.सर्वांना आशा होती लवकरच महामार्गाचे काम पुर्ण होईल अशी आशा होती. अनेक वेळा बंद पडलेले महामार्गाचे लढा नगर मनमाडसाठी या संघटनेच्या आंदोलनामुळे सुरु झाले होते.

रस्त्याचे बंद पडलेले काम सुरू होई पर्यंत अगोदर तयार केलेला महामार्ग  मागे पुन्हा जैसे थे होतांना नागरिकांनी पाहिला आहे. लोकसभा निवडणूक सुरु होताच महामार्गाचे सुरु झाले होते.महामार्गाची साडेसाती संपणार असे प्रत्येकाला वाटत होते.  लोकसभा निवडणूक संपताच रस्त्याचे काम बंद पडले आहे. 

                पावसाळा सुरू झाल्याने महामार्गावरील डांबरीकरणाचे काम बंद झाले असेल असे अनेकांना वाटत होते.परंतु अनेक ठिकाणी भराव टाकण्याचे व खडी टाकण्यासह इतर काम सुरू राहण्या ऐवजी येथिल  मशिनरीच एका राञीतून गायब झाल्याने.लोकसभा निवडणूकीच्या निकाला नंतर महामार्गाचे काम बंद झाले.महामार्गाच्या कामावर निवडणूक निकालाचा परिणाम झाला का?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी  केला आहे.महामार्गाचे काम कोणी बंद करण्यास सांगितले.लोकसभेच्या निवडणूक निकालाचा व काम बंद होण्याचा संबध आहे का?महामार्गाचे काम कोणी बंद पाडले?हे मतदार जनतेच्या लक्षात आले आहे. मतदारांनी सत्ताधारी पक्षातील उमेदवारांना घरचा रस्ता दाखवला आहे.त्याचाच परिणिम होवून महामार्गाचे काम बंद केले का?तुम्ही आमचा पराभव केला आहे.त्यामुळे आता महामार्गावर प्रवास करताना कुञ्या सारखे मरा पण महामार्गाचे काम होणार नाही. असे तर या राजकीय व्यक्तीला सुचवायचे नाही ना? राजकीय विळख्यात सापडलेला हा महामार्ग कायमच अपूर्ण राहणार का ? या महामार्गाचे काम पुर्ण कधी होणार? याचे उत्तर काळच ठरवणार असे नागरिकांना वाटते

300 कोटीचे 900 कोटीवर गेले.परंतू टक्केवारीत अडकले

महामार्गाच्या कामाची सुरवात झाली सुरुवातीला दुपदरी असलेला हा महामार्ग नंतर चार पदरी झाला. त्यावेळी सुमारे ३०० कोटीची निविदा मंजुर झाली होती.हे काम सुरु करण्याआधीच टक्केवारीमुळे संबंधित ठेकेदाराने हे काम सोडले. त्यानंतर जळगाव येथील ठेकेदाराला काम दिले. त्या ठेकेदाराने कामाचे टप्पे पाडून इतर ठेकेदाराला कामाचे वाटप केले. त्यामुळे महामार्गाच्या कामाचा दर्जा माञ घसरला गेला. वर्षभरात महामार्गाची दयनीय अवस्था झाली.’महामार्गात खड्डे कि खड्डयात महामार्ग’ हे कोणालाही समजेना.त्यानंतर  सुमारे ९००

कोटीची निविदा मंजुर झाली.परंतू  टक्केवारीत अडकली असल्याची चर्चा सध्या होत आहे. टक्केवारी नेमकी कुणाला लागते.तुम्ही जनतेचे सेवक का? महामार्गावर अपघातात कुञ्या सारखे मरणाऱ्या प्रवाशांच्या टाळूवरचे लोणी खाणारे असा सवाल नागरिक करु लागले आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here