वनवासी कल्याण आश्रमच्या वतीने दिवाळीनिमित्त पाच वाड्यावर मिठाई आणि कपडे वाटप 

0

उरण दि ३(विठ्ठल ममताबादे )सालाबाद प्रमाणे वनवासी कल्याण आश्रम उरण तालुका वतीने हिंदूंचा महत्वाचा सण असलेल्या दिपावली निमित्त मिठाईवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात  आला होता.

 कोप्रोली वाडी,विंधने वाडी, कांठवली  वाडी ,जांभूळपाडा, वेश्वी वाडी,अशा पाच वाड्यावर मिठाई वाटप करून जनजाती बांधवांचे दिवाळी गोड करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कोप्रोली ,विंधणे जांभूळपाडा या वाड्यांवर नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले.कोप्रोली वाडीवर जाताना लहान डोंगर पार करून जायला लागते. नवीन कार्यकर्ते सोबत होते त्यांना ओझी वाहून  थकायला झाले. परंतु जेव्हा खाऊ दिल्यानंतर लहान मुलांच्या चेहऱ्यावर हास्य प्रकटला तेव्हा सर्व थकवा  निघून गेला असे पदाधिकारी कार्यर्त्यांनी सांगितले.

 

वींधने वाडीवर बालसंस्कार वर्गातील मुलांनी सुंदर कविता बोलून दाखविली आणि शहरापासून दूर असलो तरी आम्हीही काही कमी नाही त्याचे जणू काही प्रात्यक्षिकच दाखवून दिले. वेश्वि वाडीवर मिठाई वाटप करीत असताना अचानक समोर एक किल्ला दिसला मुरुड जंजिरा किल्ला सारखा तो किल्ला वाटला.आणि त्या मुलाला विचारलं कोणत्या किल्ला आहे तो म्हणाला मुरुड जंजिरा आणि नंतर त्या मुलास आम्ही त्याचे नाव विचारले तेव्हा त्याने अमित कातकरी असे नाव सांगितले .उरण येथील बगाडे मॅडम यांनी सूचविलेल्या ज्या गुणी  मुलाचा आम्हाला शोध घ्यायचा होता तो प्रत्यक्ष तिथे आम्हाला दिसला,आणि हा किल्ला बनवून त्याने त्याच्यातील कलागुणांची छोटीशी झूनुकच आम्हाला दाखवून दिली. अशी माहिती मनोज ठाकूर यांनी दिली.

हस्ताक्षर ,चित्र काढणे, अभ्यास या सर्वात हा मुलगा फारच कलागुणी दिसला. त्याला पुढील अभ्यासासाठी कोणतीही मदत पाहिजे असल्यास कल्याण आश्रम तुला ती करेल अशी ग्वाही उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिली.जांभूळ पाड्यात वयस्कर आजी आजोबांना मिठाई देताना त्यांच्या डोळ्यातील भाव पाहून फारच समाधान वाटले.सर्व वाड्यांवर भगवान बिर्सा मुंडा यांचे जयंती निमित्ताने भित्तीपत्रे चिकटविण्यास आली.यावेळी तेथील जमलेल्या सर्व जनजाती बांधवांना येता विधानसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून दिलेल्या मतदानाचा अधिकार वापरून १००% मतदान करण्याचे आवाहन वनवासी कल्याण आश्रम चे वतीने अध्यक्ष मनोज ठाकूर यांनी केले.या कार्यक्रमासाठी

सहसचिव कुणाल शिसोदिया,कोकण प्रांत बाल संस्करवर्ग प्रमुख सुनंदा कातकरी, ऍड आकाश शाह,सोहम दर्णे,  सुश्मिता दर्णे,अद्वैत ठाकूर,ऋग्वेद ठाकूर, अर्णव ठाकूर, निहाल गुडेकर ही मंडळी वाडी वरील जनजाती बांधवांना आनंद देण्यासाठी उपस्थित होते.बीना इंनवेस्टर चे विपुल भाई शहा,सुशील दर्ने,जितेंद्र पटेल यांचे या उपक्रमाला मोलाचे सहकार्य लाभले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here