वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहिर शहाला अटक

0

मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणातील संशयित आरोपी मिहीर शहाला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी (9 जुलै) विरारमधून त्याला ताब्यात घेतलं आहे.तसंच त्याच्या आईला आणि बहिणीला शहापूर येथून ताब्यात घेतलं आहे. त्याला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांच्या 14 टीम तैनात करण्यात होत्या.

मुंबईतील प्रदीप नाखवा आणि त्यांची पत्नी कावेरी नाखवा रविवारी (7 जुलै) पहाटे ससून डाॅक येथून वरळीतील आपल्या घरी जात असताना त्यांच्या दुचाकीला मिहिर शहाच्या BMW कारने धडक दिली.यात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला होता.

प्रदीप नाखवा यांनी सांगितलं होतं की “तो मुलगा गाडी चालवत होता. गाडीत दोन जण होते. चालक आणि त्याच्या बाजूला एकजण बसला होता. त्याने गाडी थांबवली नाही. अपघातानंतर माझ्या बायकोला फरफटत नेलं. नाहीतर ती वाचली असती.”

मुंबईत वरळी येथील अ‍ॅट्रीया माॅलसमोर रविवारी (7 जुलै) पहाटे BMW कार चालवणाऱ्या मिहिरने दुचाकीला जोरात धडक दिली.या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य गाडीच्या बोनेटवर पडले. तसंच त्यांना फरफटत नेल्याची माहितीही समोर येत आहे. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

वरळी पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात 12 जणांना ताब्यात घेतलं आहे.मिहिर शहाला पसार होण्यात मदत केल्याप्रकरणी त्याची आई, दोन बहिणी आणि मैत्रीण यांना ताब्यात घेतलं आहे. मिहिर बुधवारी (10 जुलै) कोर्टात हजर करण्यात येईल.

मुंबईतील वरळी कोळीवाडा या परिसरात राहणारे नाखवा दाम्पत्य रविवारी (7 जुलै) पहाटे साधारण पाच वाजताच्या सुमारास दक्षिण मुंबईतील ससून डाॅक येथे मासे खरेदीसाठी गेले होते. नाखवा कुटुंब मासेविक्री करतं. यासाठी डाॅकमधून मासे आणण्यासाठी पहाटे गेले असता तिथून परत येत असताना अॅट्रीया माॅल समोरील रस्त्यावर बीएमडब्ल्यूने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

प्रदीप आणि कावेरी नाखवा हे दोघंही कारच्या बोनेटवर आदळले. तरीही कार चालकाने गाडी थांबवली नाही तर दोघांनाही फरफटत नेले. यात कावेरी जवळपास 100 मीटरपर्यंत फरफटत गेल्याने चाकाखाली येवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रदीप नाखवा जखमी झाले. जखमी अवस्थेतही त्यांनी टॅक्सी पकडून कार चालक मिहीर शहाला पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो फरार झाला. पण मंगळवारी (9 जुलै) विरार येथून मिहीर शहाला अटक करण्यात आली त्याला पकडण्यासाठी मिहीर शहाला शोधण्यासाठी पोलिसांच्या 14 टीम होत्या. तर राजऋषी बिडावत याला 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here